Shivsena News: मोठी बातमी: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचा मोठा दावा; म्हणाले,'आपणही सत्तेसोबत गेलं पाहिजे...'

Uddhav Thackeray Shivsena Leader On ZP Election : राजकारणातील सगळी तत्व आम्हीच पाळायची का? इतर राजकीय पक्ष कसेही वागतात? सत्तेसाठीच्या तडजोडी करतात, मग आपणही सत्तेसोबत गेलं पाहिजे, अशी भावना जर आमच्या सदस्यांची असेल तर त्यात काही गैर नाही. आमच्या निवडून आलेल्या सदस्यांची इच्छा ही सत्तेत जाण्याची आहे.
Uddhav Thackeray -Eknath Shinde
Uddhav Thackeray -Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : राजकारणातील सगळी तत्व आम्हीच पाळायची का? इतर राजकीय पक्ष कसेही वागतात? सत्तेसाठीच्या तडजोडी करतात, मग आपणही सत्तेसोबत गेलं पाहिजे, अशी भावना जर आमच्या सदस्यांची असेल तर त्यात काही गैर नाही. आमच्या निवडून आलेल्या सदस्यांची इच्छा ही सत्तेत जाण्याची आहे, असे विधान करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीला अवघे काही तास शिल्लक असताना अंबादास दानवे यांनी केलेले हे विधान गांभीर्यान केले आहे, की मग खडा टाकून पाहिला आहे? हे उद्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर स्पष्ट होईल. आम्हाला भाजपा-शिंदेची शिवसेना दोघेही दूरचे नाहीत, राजकारणात काहीही शक्य आहे, असे सांगत अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजपा-शिवसेनेचे फाटले तर आम्ही संधी साधू, असे सांगत महायुतीतील मतभेदाला हवा दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सर्वाधिक 23 जांगासह भाजपा मोठा भाऊ ठरला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे 21 सदस्य निवडून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 1, काँग्रेस 1 तर पाच ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीवरून जिल्ह्यात भाजप-शिवसेनेमधील मतभेद वाढले होते. परंतु याचा फटका अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बसू नये याची काळजी राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

भाजपाला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी शिंदेंची शिवेसना उद्धव ठाकरेंच्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन अध्यक्ष पदावर दावा सांगण्याच्या हालचाली मध्यंतरी सुरू झाल्या होत्या. यासाठी काही सदस्यांना बाहेरच्या राज्यात सहलीवर पाठवण्यात आले होते. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सदस्यांची भेट घेऊन चर्चा केल्याचीही माहिती होती. परंतु या सगळ्या घडामोडी आणि शक्यतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याचे समजते.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
Rajya Sabha election 2026 : एकनाथ शिंदेंचा मोठा दणका! पराभूत मोहरा पुन्हा उतरवला मैदानात; राज्यसभेसाठी शिवसेनेकडून 'या' नेत्याचे नाव निश्चित?

राज्याच्या सत्तेत एकत्र असल्यामुळे जिल्हा परिषदेतही एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने आपला नियोजित भाजपा विरोधी कार्यक्रम गुंडाळला आहे. उद्या होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष होणार असा दावा केला जातोय. अशावेळी अंबादास दानवे यांनी केलेले विधान महायुती किती गांभीर्याने घते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेमचेंजर सत्तार गप्प?

जिल्हा परिषदेच्या राजकारणात गेमचेंजर अशी ओळख असलेले शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार सध्या शांत आहेत. 2017 मध्ये ते काँग्रेसमध्ये असताना सर्वाधिक 22 जिल्हा परिषद सदस्य भाजपाचे असताना सत्तार यांच्या खेळीनेच त्यांना पाच वर्ष सत्तेबाहेर ठेवले होते.

या निवडणुकीत सत्तार यांचा मुलगा अंभई गटातून निवडून आलेला आहे. परंतु विधानसभा निवडणुकीतील अवघ्या 2420 अशा कमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर सत्तार यांनी आपले लक्ष मतदारसंघाची नव्याने बांधणीत घातले.

Uddhav Thackeray -Eknath Shinde
मोठी बातमी : भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका

शिवसेनेच्या जिल्हा, राज्य स्तरावरील संघटनात्मक कार्यक्रमातही ते फारसे दिसले नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी आपल्या मतदारसंघात भाजपासोबत युती न करता स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे सत्तार सध्या शांत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com