MLA Rohit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

MLA Rohit Pawar : मनुस्मृतीची होळी करण्याची हिंमत दाखवणार का?; आमदार पवारांनी भाजपला घेतलं अंगावर

Pradeep Pendhare

BR Ambedkar Photo : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांना घेरण्यासाठी भाजप मैदानात उतरली असतानाच, त्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीतील सहकारी देखील पुढे येऊन भाजपला अंगावर घेऊ लागले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी डाॅ. बाबासाहेब आंबडेकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत दाखवणार का? असा सवाल करत भाजपची कोंडीचा प्रयत्न केला.

मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात संदर्भासाठी घेण्याच्या मुद्यावरून काल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन केले. जितेंद्र आव्हाड यांच्याकडून यावेळी अनवधानाने महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असलेला फोटोचा अवमान झाला. या मुद्यावरून भाजप (BJP) आक्रमक झाली असून, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात राज्यभर आंदोलने करत आहेत. या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या 24 जणांविरोधात देखील झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजप जेवढी आक्रमक झाली आहे, तेवढेच त्यांच्या बचावासाठी महाविकास आघाडीतील नेते पुढे येऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी बाजू घेत भाजपला सुनावले आहे.

या दोघा नेत्यांच्या पाठोपाठ आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपचा समाचार घेतला आहे. 'जितेंद्र आव्हाड यांच्या नसानसात डाॅ. बाबासाहेब आंबडेकरांचे विचार आहे, त्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून अनवधानाने चुक झाली. ही चुक लक्षात येताच त्यांनी तत्काळ जाहीर माफी मागितली. आंबेडकरी जनतेने देखील त्यांना माफ केले आहे, असे असताना भाजपची ही आंदोलन म्हणजेच वेगळाच विषय आहे', असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पोर्शे कार अपघातामुळे नाक कापले...

"पुण्यातील (Pune) पोर्शे कार अपघात प्रकरणात देशभरात नाक कापल्याने या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपकडून आंदोलन सुरू आहे. भाजपला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा इतका कळवळा कधी आला? आणि खरंच मनापासून प्रेम असेल तर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणे मनुस्मृतीची जाहीर होळी करण्याची हिंमत भाजप दाखवणार आहे का?", असा प्रश्न रोहित पवार यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT