prithviraj chavan Met Manoj Jarange Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Maratha Reservaiton News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण थेट जरांगेंच्या भेटीला..

Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil : राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था, बदलापूरची घटना आणि या घटनेचा निषेध म्हणून येत्या 24 रोजी महाविकास आघाडीने दिलेली महाराष्ट्र बंद ची हाक या सगळ्यांचा संबंध चव्हाण यांनी घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीशी लावला जात आहे.

Jagdish Pansare

Maratha Reservation News : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांच्या विरोधात उमेदवार उभे करत त्यांना आव्हान देण्याची भाषा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले होते.

त्यानंतर महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केले होते. मनोज जरांगे पाटील यांनीही महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेस मराठा आरक्षणाच्या मुद्यावर काय भूमिका घेते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील ढासळत चाललेली कायदा व सुव्यवस्था, बदलापूरची घटना आणि या घटनेचा निषेध म्हणून येत्या 24 रोजी महाविकास आघाडीने दिलेली महाराष्ट्र बंद ची हाक या सगळ्यांचा संबंध चव्हाण यांनी घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीशी लावला जात आहे. मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांचा मराठा आरक्षण विषयावर अभ्यास आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Manoj Jarange Patil) नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या विरोधात असलेल्या रोषाचा फायदा झाला होता.

भाजपचे मिशन 45 फेल करण्यात मराठा आरक्षण हा विषय कळीचा मुद्दा ठरला होता. काँग्रेस पक्षाचे 13 खासदार राज्यात निवडून आल्यामुळे या पक्षाला जणू संजिवनीच मिळाली. अशावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घेतलेल्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. 29 आॅगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला एक वर्ष पुर्ण होत आहे.

या निमित्ताने ते विधानसभा निवडणुकीत उमेदवार द्यायचे, की पाडायचे याचा निर्णय घेणार होते. पंरतु विधानसभेच्या निवडणुका राज्य सरकारने घाबरून पुढे ढकलल्याचा आरोप करत जरांगे यांनी 29 रोजी होणारी बैठक पुढे ढकलली. सरकारला आपली रणनिती कळू नये, त्यांचा डाव यशस्वी होऊ नये, यासाठी बैठक पुढे ढकलल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले होते.

आजच्या बैठकीत मराठा आरक्षणा संदर्भात काँग्रेसची भूमिका काय आहे? हे पृथ्वीराज चव्हाण यांनी जरांगे पाटील यांना सांगितल्याचे बोलले जाते. तसेच बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांनी केल्याचेही बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT