Ajit Pawar_Anjali Damania 
महाराष्ट्र

Anjali Damania: अजित पवारांविरोधात जिवापाड लढले... पण आता डोकं सुन्न झालंय! अंजली दमानियांनी व्यक्त केल्या भावना

Anjali Damania: राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुणे-बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचं वृत्त ऐकून अवघा महाराष्ट्र हळहळला आहे.

Amit Ujagare

Anjali Damania: राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुणे-बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाचं वृत्त ऐकून अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. यानिमित्त अजित पवारांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मित्र आणि विरोधक यांनाही त्यांच्या अकाली जाण्यानं धक्का बसला आहे. त्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही धक्का बसला आहे. अजित पवारांविरोधात कायम भूमिका घेणाऱ्या अंजली दमानिया यांनी आपलं डोक सुन्न झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराम अंजली दमानिया यांनी ट्विट केलं. यातून त्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आपले अजित पवारांशी कितीही मतभेद असले कितीही विरोध असला तरीही ही बातमी माझ्यासाठी धक्का न पचवणारी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं की, "डोकं खूप खूप सुन्न झालं ऐकून! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचं घडलं. हे इतकं धक्कादायक आहे की, स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे…… खूप!'

दरम्यान, झेडपीच्या निवडणुकीच्या निमित्त प्रचारासाठी अजित पवार हे मुंबई विमानतळावरुन चार्टर विमानानं सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बारामतीकडे येण्यासाठी निघाले त्यानंतर बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असतानाच सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी त्यांचं विमान हे धावपट्टीपासून शंभर मीटर अंतरावर बाजुला कोसळलं. सकाळच्या वेळेत धुक्यामुळं कमी झालेल्या दृश्यमानतेमुळं हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT