Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या निधनानिमित्त आज शासकीय सुट्टी जाहीर, तीन दिवसाचा दुखवटा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात निधन झालं. यामुळं महाराष्ट्रानं मोठा जननेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
NCP leader and Deputy CM Ajit Pawar died in plane crash
NCP leader and Deputy CM Ajit Pawar died in plane crashSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं सकाळी विमान अपघातात निधन झालं. यामुळं महाराष्ट्रानं मोठा जननेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्याच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या निधानामुळं महाराष्ट्रानं एक अभ्यासून आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. तसंच या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात आज शासकीय सुट्टी आणि तीन दिवस राज्य दुखवटा जाहीर केला.

NCP leader and Deputy CM Ajit Pawar died in plane crash
Supriya Sule: अजित पवारांच्या निधनावर सुप्रिया सुळेंचं व्हॉट्सअॅप स्टेट्स! अत्यंत तीव्र शब्दांत व्यक्त केल्या भावना

महाराष्ट्राची जाण असलेला लोकनेता गेला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अजितदादा हे महाराष्ट्राचे लोकनेते होते, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजितदादा हे अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होतं. तसंच सर्वपरिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं असं व्यक्तीमत्व होतं. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्षे लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकसात अतिशय महत्वापूर्व योगदान ते देत होते. अशा काळात त्यांचं निघून जाणं हे मनाला चटका लावणारं आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार असा मित्र सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथ शिंदे आम्ही लवकरच बारामतीकडं निघणार आहे. सकाळपासून मी सर्वांच्या संपर्कात आहे"

NCP leader and Deputy CM Ajit Pawar died in plane crash
Ajit Pawar Plane Crash: अपघातग्रस्त विमानात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह कोण होतं? जाणून घ्या

शासकीय सुट्टी अन् दुखवटा जाहीर

महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यासोबत तीन दिवसाचा दुखवटा देखील जाहीर करण्यात आलेला आहे. कधीही भरुन न निघणारं हे अशा प्रकारचं नुकसान आहे. महाराष्ट्रातील लोकनेता गेल्यानंतर त्याची कमी भरुन काढणं हे अतिशय कठीण आहे. त्याचसोबत इतक जवळून आणि इतक्या संघर्षातून आम्ही काम केलेलं आहे, त्यामुळं अशा गोष्टीवर विश्वास ठेवायलाच मन तयार होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com