Ajit Pawar Plane Crash: अपघातग्रस्त विमानात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह कोण होतं? जाणून घ्या

Ajit Pawar Plane Crash: बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी मुंबईहून विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते.
air plane crash
air plane crash Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झालं आहे. त्यांच्यासोबत विमानात असलेल्या सर्व ६ व्यक्तींचाही मृत्यू झाला असून अजित पवारांसोबत विमानात कोण कोण होतं? याची माहिती समोर आली आहे.

विमानात कोण होतं?

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जण या विमानातून बारामतीकडं निघाले होते. या चार्टर विमानातील इतर प्रवाशांमध्ये पुढील व्यक्तींचा समावेश होता.

1. अजित पवार

2. मुंबई पीएसओ HC विदीप जाधव

3. पायलट कॅप्टन सुमित कपूर

4. कॅप्टन संभवी पाठक

5. पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट

air plane crash
Ajit Pawar Plane Crash : धक्कादायक बातमी: अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

नेमकं काय घडलं?

VT-SSK नोंदणी असलेलं नॉन शेड्युल फ्लाईट प्रकारातील हे चार्टर विमान होतं. या विमानातून एकूण पाच जण प्रवास करत होते. मुंबई विमानतळाच्या जीए टर्मिनल इथून आज 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी या विमानानं बारामतीकडं जाण्यासाठी उड्डाण केलं. त्यानंतर साधारण सकाळी 8.50 वाजण्याच्या सुमारास हे विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या प्रयत्नात होतं. पण सकाळच्या सुमारास दृश्यमानता कमी असल्यानं वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यानं उतरताना एका मोकळ्या जागेत हे विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानं पेट घेतला हा स्फोट इतका भीषण होता की क्षणार्धात संपूर्ण विमान जळून खाक झालं. यामध्ये सर्वच्या सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.

air plane crash
Ajit Pawar Plane Crash: अपघातग्रस्त विमानात मृत्यू झालेल्यांमध्ये अजित पवारांसह कोण होतं? जाणून घ्या

बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते. त्यासाठी मुंबईहून विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.