Petrol & Diesel price today in maharashtra Sarkarnama
महाराष्ट्र

Petrol Diesel Latest Rates : इंधनाचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ; तुमच्या शहरातील आजचे नवे दर पाहा एका क्लिकवर !

Petrol price today in maharashtra : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तुमच्या शहरातील आजचे नवीन इंधन दर एका क्लिकवर जाणून घ्या आणि सर्वसामान्यांवर होणारा परिणाम समजून घ्या.

Rashmi Mane

Fuel price increase latest update:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खिशावर जाणवू लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत.

तीन दिवसापूर्वी पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली होती. आज पुन्हा दर वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात 0.94 रुपयांची तर डिझेलच्या दरात 0.91 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारकांची चिंता आणखी वाढली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधन दर सतत वाढत आहेत. दोन दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या दरात तब्बल 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दरवाढ झाल्याने तीन दिवसांत दुसऱ्यांदा नागरिकांना महागाईचा फटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम वाहतूक, भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर दैनंदिन वस्तूंवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 107 ते 109 रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर डिझेलचे दरही 94 ते 95 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. त्यामुळे खासगी वाहन वापरणाऱ्यांसह व्यावसायिक वाहनधारकांचाही खर्च वाढला आहे.

पुण्यात पेट्रोलचा दर 107.89 रुपये प्रति लिटर झाला असून डिझेल 94.39 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये तर डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. ठाण्यात पेट्रोल 107.98 रुपये आणि डिझेल 94.47 रुपये प्रति लिटर झाले आहे.

नाशिकमध्ये पेट्रोल 108.84 रुपये तर डिझेल 95.35 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. परभणीत पेट्रोल 109.49 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर झाले आहे. नागपुरात पेट्रोलचा दर 108.07 रुपये प्रति लिटर असून डिझेल 94.63 रुपये प्रति लिटर आहे.

वाशिममध्ये पेट्रोल 109 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले असून डिझेल 95.53 रुपये प्रति लिटर आहे. सोलापूरात पेट्रोल 108.41 रुपये तर डिझेल 94.93 रुपये प्रति लिटर विकले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलचा दर 109.10 रुपये प्रति लिटर असून डिझेल 95.58 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय परिस्थिती सुधारली नाही तर पुढील काही दिवसांत इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पुन्हा बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT