NCP Political News: दादा नाहीतर कोणीच दाद देईना! राष्ट्रवादीत खदखद? पुण्यात कार्यकर्ते नाराज, भाजपसोबत फरफट

NCP workers in Pune:अजित पवार यांच्या राजकीय अडचणींनंतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. भाजपसोबत जाताना पक्षाची फरफट होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
NCP workers in Pune
NCP workers in PuneSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात आकस्मिक निधन झाले अन् पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा जणू वालीच हरपला. एकहाती नेतृत्व करणाऱ्या अजितदादांच्या जाण्याने पक्षात आपले काय होणार, असा उद्विग्न प्रश्न पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पडला होता.

दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्याचे उपमुख्यमंत्रीपद आणि पुण्याचे पालकमंत्रिपद आले, तर पार्थ पवार यांना राज्यसभेवर संधी मिळाली, ज्यामुळे कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, अजितदादांच्या निधनाला आता साडेतीन महिने उलटून गेले तरी सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार या दोन्ही नेत्यांनी पुण्यातील पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांना फिरकूनही पाहिलेले नाही, ना त्यांची कोणती बैठक घेतली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

नेत्यांच्या या उदासीनतेमुळे पुण्यातील पक्ष संघटनेत उघड नाराजी पाहायला मिळत आहे. पश्चिम विभागाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप हे स्वीकृत नगरसेवक निवडीपासून नाराज असल्याने पक्षाच्या बैठकांना दांडी मारत आहेत.

NCP workers in Pune
Maharashtra Government Employees: राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA थकबाकी मेच्या पगारासोबत मिळणार

दोनवेळा पत्र

राज्यात सत्तेत एकत्र असूनही पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसची जाणीवपूर्वक कोंडी केली जात असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीला प्रभाग समिती अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपने क्षेत्रीय कार्यालयांच्या पुनर्रचनेत थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला. यावर स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दोनवेळा पत्र लिहूनही महापालिकेच्या कारभारात कोणताही फरक पडलेला नाही.

NCP workers in Pune
Pune Crime News: पुणे पुन्हा हादरलं! कोरेगाव पार्कमध्ये धावत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार

कोणतीही ठोस भूमिका नाही

महापालिकेच्या मुख्य सभेत जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत येते, तेव्हा तेव्हा भाजपचे पदाधिकारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या माध्यमातूनच राष्ट्रवादीचा विरोध मोडीत काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षनेतृत्वाची कोणतीही ठोस भूमिका नसल्यामुळे महापालिकेत हक्काची विरोधी भूमिका घेण्याऐवजी राष्ट्रवादीला भाजपसोबत फरफटत जावे लागत आहे.

NCP workers in Pune
Anganwadi In ZP Schools: ZP शाळांमध्ये आता अंगणवाडीचे वर्ग; येत्या शैक्षणिक वर्षापासून नवा निर्णय लागू

आता दाद कोणाकडे मागायची?'

'दादा होते तर थेट निर्णय व्हायचा, आता नक्की दाद कोणाकडे मागायची?' असा उद्विग्न सवाल पुण्यातील पदाधिकारी करीत आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर पुण्यात पक्षाची अवस्था आणखी बिकट होईल, अशी जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com