Manoj Jarange on Girish Mahajan Sarkarnama
महाराष्ट्र

Video Girish Mahajan : 'मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत...', भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टच सांगितलं

Girish Mahajan Manoj Jarange maratha reservation : आमचं सगळं शासन, उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहे. नियमात बसणारे आम्ही आरक्षण त्याठिकाणी देणार आहोत. विधानसभेचे सत्र घेऊन आम्ही 10 टक्के आरक्षण आम्ही दिलं देखील आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.

Roshan More

Girish Mahajan News : मनोज जरांगे पाटील 16 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांच्याशी अजून सरकराने संपर्क साधलेला नाही. त्यात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंच्या मागणी विषयी मोठं वक्तव्य केलं आहे.

'नियमात आहे तसेच सरकार करणार. नियमबाह्य आहे ते आम्ही काही करणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्यात आहेत त्या कोर्ट देखील मान्य करणार नाही.', असे गिरीश महाजन म्हणाले.

प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजालातील मुला मुलींना त्याचा फायदा झाला पाहिजे. जे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकायला पाहिजे. ते कोर्टात टिकायला पाहिजे ना. आम्ही निर्णय केला आणि कोर्टाने तो फेकून दिला मग करणार काय?, असे देखील महाजन यांनी सांगितले

मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत. आमचं सगळं शासन, उपमुख्यमंत्री यात लक्ष घालत आहे. नियमात बसणारे आम्ही आरक्षण त्याठिकाणी देणार आहोत. विधानसभेचे सत्र घेऊन आम्ही 10 टक्के आरक्षण आम्ही दिलं देखील आहे.

जरांगेंचा सरकारला इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी जीवघेणा प्रवास सुरू केला आहे. आमचा अंत पाहू नका, अजूनही वेळ गेलेली नाही. आरक्षण द्या, नाहीतर तुमचे बारा-तेरा वाजवल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

...तर फडणवीस जबाबदार

मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सुरू करण्याच्या आधी जर मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर त्यासाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असे म्हटले होते. तसेच मी राजकारणावर बोलणार नाही पण तुम्ही आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. आता मी राजकारणावर बोलत नाही उपोषणालाच बसलो आहे, असे म्हणत जरांगे पाटलांनी भाजप नेत्यांना टोला लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT