Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
महाराष्ट्र

Girish Mahajan Vs Khadse: IAS महिला अधिकाऱ्याशी संबंधांचा आरोप जिव्हारी; मंत्री महाजनांनी खडसेंना खेचलं थेट कोर्टात; पहिलं पाऊलही टाकलं

Girish Mahajan Notice To Eknath Khadse : एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत,असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

Deepak Kulkarni

Jalgaon News : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातलं राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहेत. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हे दोघेही नेते सोडत नाही. पण काही दिवसांपूर्वी आमदार खडसेंनी गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. यावर महाजनांनी आता कठोर पाऊल उचललं असून थेट आमदार एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे.

मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता.14) मीडियाशी संवाद साधतानाच एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एकनाथ खडसेंना (Eknath Khadse) अब्रु नुकसानीची नोटीस पाठवल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे खडसेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

महाजन म्हणाले, कुणीही यावं आपल्यावर काहीही आरोप करावेत हे आपण आता सहन करणार नाही. यामुळे समाजातल्या आपली प्रतिमा मलीन होते.त्यामुळेच आपण आता मुंबईतील वकिलांमार्फत एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना आपण अब्रु नुकसानीची नोटीस पाठवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.तसेच या लोकांविरोधात आता आपण कोर्टातच लढणार असल्याचं स्पष्ट भूमिकाही खडसेंनी यावेळी मांडली आहे.

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत,असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसेंनी एक पुरावा द्यावा,मी राजकारण सोडेन,असं खुलं आव्हानही महाजन यांनी खडसेंना दिलं होता.मी एकनाथ खडसे यांची एक गोष्ट सांगितली तर ते बाहेर निघाले तरी लोक त्यांना जोड्याने मारतील असा तिखट पलटवारही केला होता.

तसेच मी अजूनही त्यांना आव्हान देतो. त्यांनी फक्त एक पुरावा दाखवावा, मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडतो. मी कधीच कोणाला तोंड दाखवणार नाही. त्यांनी पुवावे लोकांना दाखवावेत. त्यांनी नुसतं बडबड करू नये. यांना पुरावे दिले, त्याला पुरावे दिले, असे करू नये, असंही चॅलेंज भाजप नेते महाजन यांनी खडसे यांना दिले होते.

''...तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल!''

गिरीश महाजनांनी यावेळी एकनाथ खडसेंना खडेबोल सुनावले होते.खोटं बोलताना लाज वाटत नाही. माझं अजूनही त्यांना आव्हान आहे की, त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा आता त्यांनी अंत पाहू नये. मी एका गोष्टीचा खुलासा केला, तर तोंड काळं करूनच बाहेर पडावं लागेल. घरातलीच गोष्ट आहे. पण मी ती बोलणार नाही, अशा थेट इशाहारी महाजन यांनी खडसे यांना दिलाय. मला बोलयला लावू नका. खडसे यांनी एका भोंदू पत्रकाराला सांगून हा विषय उचलायला लावला. त्यातूनच हे सगळं समोर आलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

खडसेंचे महाजनांवर केलेले नेमके आरोप काय?

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन आणि एक महिला आयएएस अधिकारी यांच्यात संबंध आहेत. याची कल्पना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनादेखील आहे. एका पत्रकाराच्या हवाल्याने त्यांनी हा दावा केला आहे. विशेष म्हणजे अमित शाहा आणि माझी कधी भेट झालीच तर मी महाजन यांच्यावरील या आरोपांबाबत विचारणार आहे, असंही त्यांनी सांगितलंय. खडसे यांच्या आरोपांनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT