Chitra Wagh Sarkarnama
महाराष्ट्र

Shahapur School Controversy : शाळेत मासिक पाळीच्या बहाण्याने मुलींना विवस्त्र केले, चित्रा वाघ प्रचंड संतापल्या; मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर गुन्हा

Controversy Shahapur School Chitra Wagh :शाळेतील बाथरुमध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर मुख्याध्यापिकेंच्या आदेशावरून शाळेतील 300 विद्यार्थ्यींना एकत्र बोलवण्यात आले. त्यांना बाथरुमधील रक्ताचे डाग प्रोजक्टरवर दाखवण्यात आले.

Roshan More

Chitra Wagh News : ठाणे जिल्हातील शहापूरमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील पाचवी ते 10 वीतील विद्यार्थ्यींना विवस्त्र करत त्यांची तपासणी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या बाथरुममध्ये रक्ताचे डाग आणि भिंतींवर रक्ताचे ठसे आढळल्याने मासिक पाळीच्या संशयावरून पाचवी ते दहावीच्या विद्यार्थींना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्यात आली. या घटनेनंतर शाळेच्या मुख्यध्यापिकेसह आठ जणांवर पोक्सअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर भाजप आमदार चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

'शहापूरममधील शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे.', असे वाघ यांनी म्हटले.

300 विद्यार्थ्यींना बोलवले अन्...

शाळेतील बाथरुमध्ये रक्ताचे डाग आढळल्यानंतर मुख्याध्यापिकेंच्या आदेशावरून शाळेतील 300 विद्यार्थ्यींना एकत्र बोलवण्यात आले. त्यांना बाथरुमधील रक्ताचे डाग प्रोजक्टरवर दाखवण्यात आले. तसेच मासिक पाळी कोणाला आली हे विचारण्यात आले. मासिक पाळी आलेल्या विद्यार्थ्यांची हाताचे ठसे घेण्यात आले तसेच त्यांना विवस्त्र करून त्यांची तपासणी करण्याचे काम पाच शिक्षकांना देण्यात आले.

विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित

शहापूर मध्ये घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबात आमदार चित्रा वाघ यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्या म्हणाल्या, पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यानींचे अंतवस्त्र काढून त्यांना तपासण्यात आले. हे शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या निर्देशावर झाले. मुख्याध्यापिकेसह तिच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हा अतिशय संतापजनक प्रकार आहे. विद्यार्थ्यांनी काय वाटते असेल याचा विचार व्हावा. अशा घटना प्रकार खपवून घेतले नाही पाहिजेत. शहापूर मध्ये घडलेल्या संतापजनक प्रकार भविष्यात कुठल्या शाळेत होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

खपवून घेणार नाही...

या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे. आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे. तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT