Raj- UddhavThackeray Alliance : ठाकरे बंधूंना रोखण्याचा प्लॅन एकनाथ शिंदेंनी दिल्लीत ठरवला, अमित शाहांसोबतच्या चर्चेची इनसाईड स्टोरी आली समोर!

Eknath shinde BJP Amit Saha BMC Election : एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली दौऱ्या केला. या दौऱ्यात त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. शिंदे यांनी दिल्ली दौऱ्या नेमका कशासाठी केला याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.
Raj  Thackeray Uddhav Thackeray Eknath shinde
Raj Thackeray Uddhav Thackeray Eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Eknath shinde Politics : पावसाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घाई घाईने बुधवारी सायंकाळी अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. राज-उद्धव ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू असताना शिंदेंनी अचनाक दिल्ली दौऱ्या केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्या नेमका कशासाठी केला याची इनसाईड स्टोरी समोर आली आहे.

शिंदेंनी ठाकरे बंधूंच्या युतीचा धसका घेतला आहे. या विषयीच आणि आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत काय रणनीती आखावी यासाठी चर्चा करण्यासाठी अमित शाहांनी दिल्लीत भेटल्याचे समोर आले आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लांबणीवर टाकता येते का? याची चाचपणी देखील शिंदेंनी या दौऱ्यात केली. तसेच ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यांना टार्गेट केले तर महायुतीच्या मागे हिंदी मतदार ठामपणे उभा राहील का? याची चाचपणी देखील करण्यात आली असल्याची माहिती आहे.

Raj  Thackeray Uddhav Thackeray Eknath shinde
राणे पिता-पुत्रांनी भाजपऐवजी स्ट्राँग केलं स्वतःचं नेटवर्क; नव्या प्रदेशाध्यक्षांचा होमग्राऊंडवरच निघणार घाम!

ठाकरे बंधूंना घेरण्याची रणनीती

अमित शहा यांच्यासोबत ठाकरे बंधू एकत्र येत असताना विविध पर्यायावर शिंदेंनी चर्चा केल्याची माहिती आहे. निवडणूक लांबणीवर टाकण्यापासून महायुतीसोबत आणखी कोणत्या छोट्या पक्षांना सोबत घेता येईल. हिंदी पट्ट्यातील नेते मराठी विरोधात जी विधाने करतायेत त्यांना वाद टाळता येईल का? त्या विधानांचा संभाव्य परिणाम ठाकरे बंधूंना घेरण्यासाठी आणि हिंदी मतदारांना एकत्र येण्यासाठी कसा करता येईल या दृष्टीने ठाकरे बंधूंना घेरण्याची रणनीती ठरल्याची माहिती आहे.

शहांनी राज ठाकरेंची भूमिका समजून घेतली

राज ठाकरे यांचा त्रिभाषा सुत्राला नेमका विरोध का आहे? आणखी कोण कोण याला विरोध करत आहे. याबाबत राज ठाकरे यांची नेमकी भूमिका काय आहे? याची माहिती अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली. तसेच शिंदेंच्या काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे वाद होत आहेत ते टाळण्याचा सल्ला देखील शहांनी एकनाथ शिंदेना दिला.

Raj  Thackeray Uddhav Thackeray Eknath shinde
Satej Patil : खाणीतून सरकारला 100 कोटींचा चुना? एका व्यावसायिकाने हेलिकॉप्टरही घेतलं : सतेज पाटलांच्या प्रश्नानंतर वादळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com