मनोज जरांगे यांनी नेमकं टार्गेट काय आहे ते ठरवलं पाहिजे., मराठा समजाला आरक्षणाबाबतचं त्यांचं टार्गेट आहे, की नेत्यांच्यावर त्यांचं टार्गेट आहे? असे प्रश्न भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला आहे.
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगे यांची सध्या पश्चिम महाराष्ट्रात शांतता रॅली सुरू आहे. या दरम्यान ते सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करताना दिसून येत आहे. तर त्यांना भाजप नेत्यांकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनीही मनोज जरांगे यांना टोला लगावला आहे.
गोपीचंद पडळकर म्हणाले, 'देवेंद्र फडणवीसांवर(Devendra Fadnavis) सातत्याने बोललं जात आहे. पण त्यांनी ज्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू लावून धरली नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना, सरकारने दिलेल्या वकिलानेच सांगितलं, की त्यांनी आम्हाला गायकवाड आयोगाचा अहवाल व्यवस्थितपणे दिला नाही.
प्रतिज्ञापत्र करून दिला नाही, त्यावर स्वाक्षऱ्या नव्हत्या. तेव्हा पवारांच्या नेतृत्वातील सरकार होतं, उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री होते, यांना तुम्ही लक्ष्य करणार की नाही? का नुसतं या सगळ्या गोष्टींवर राजकारण करणार आहात? याचाही विचार होण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने बोलणं याचा अर्थ या सगळ्या विषयाला राजकीय रंग आलेला दिसत आहे.'
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एक मोठं विधान केलं आहे. आम्ही मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत.
मात्र, त्यासाठी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आमचा याला पाठिंबा असल्याचे वचन द्यावं, असं दानवेंनी (Raosaheb Danve) म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांची नेमकी भूमिका काय? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.