Video Raosaheb Danve : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार, पण...; रावसाहेब दानवेंचं मोठं विधान

Raosaheb Danve On Manoj Jarange Patil : "आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला जितके आरक्षण देणे शक्य आहे, तितके आरक्षण आम्ही दिले आहे. परंतु, त्याच्यावर मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेलं नाही."
Manoj Jarange  Raosaheb Danve
Manoj Jarange Raosaheb Danvesarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 07 August : मराठा आरक्षणासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी एक मोठं विधान केलं आहे. आम्ही मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार आहोत.

मात्र, त्यासाठी विरोधकांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आमचा याला पाठिंबा असल्याचे वचन द्यावं, असं दानवेंनी (Raosaheb Danve) म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत विरोधकांची नेमकी भूमिका काय? याबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, आम्हाला कायद्याच्या चौकटीत राहून मराठा समाजाला जितके आरक्षण देणे शक्य आहे, तितके आरक्षण आम्ही दिले आहे. परंतु, त्याच्यावर मनोज जरांगे पाटील यांचे समाधान झालेलं नाही. त्यापेक्षा जास्त आरक्षण हवे असेल तर ते मागण्याचा अधिकार जरांगेंना असल्याचं दानवे यांनी म्हटलं.

Manoj Jarange  Raosaheb Danve
Mahayuti News : महायुतीने विधानसभेसाठी टाकले पुढचे पाऊल; समन्वय समितीचा प्लॅन ठरला

तसंच यावेळी त्यांनी विरोधकांना देखील आवाहन केलं. ते म्हणाले, "आता ज्यांना कोणाला जास्त मतं पडली आहेत आणि जे निवडून आले त्यांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकच मागणी करावी की, जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील म्हणतात त्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आरक्षण द्यायला आम्ही तयार आहोत. फक्त तसं वचन विरोधकांनी आपल्या जाहीरनाम्यात द्यावं." असं म्हणत दानवे यांनी विरोधकांच्या आरक्षणाबाबतच्या भूमिकेबाबतचा मुद्दा चर्चेत आणला आहे.

Manoj Jarange  Raosaheb Danve
Ajit Pawar : अजितदादांनी विरोधकांना केला 'जय महाराष्ट्र'; त्यांनी राजकारण करीत राहावे...!

जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवारी उभे करण्याचं वक्तव्य केलं आहे. यावर बोलताना ते म्हणाले, "त्यांच्या भूमिकेचं आम्हाला काहीही वाटत नाही. जरांगेंनी खुशाल उमेदवार उभे करावेत. त्यांचा तो अधिकार आहे. उमेदवार उभे करु नका, असं कोणीही म्हणू शकत नाही. त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यापासून कोणी रोखू शकणार नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com