Gopichand Padalkar Sarkarnama
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाने जिल्हा बँकेतील अर्ज वैध ठरवला

Gopichand Padalkar Supreme Court : सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय घेत पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे. मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर खंडपीठाने पडळकरांचा अर्ज अवैध ठरवला होता. त्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

Rahul Gadkar

Gopichand Padalka News : मुंबई हायकोर्टाने आमदार गोपीचंद पडळकर यांचा सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज अवैध ठरवला होता. या विरोधात पडळकर हे सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय घेत पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे. त्यामुळे पडळकर यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पडळकर यांनी शक्तिप्रदर्शन करत जत अ सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या या अर्जावर माजी आमदार विक्रमसिंह सावंत आणि सुजय शिंदे यांनी आक्षेप घेत कोर्टात धाव घेतली होती.

मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने यावर निर्णय देताना गोपीचंद पडळकर यांचा अर्ज अवैध ठरवत त्यांना अपात्र ठरवले होते. मात्र, त्यानंतर पडखळकरांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

पडळकरांच्या कोणीकोणूर सर्वसेवा सहकारी सोसायटीचे सभासदत्वाला आणि निंबवडे ग्रामीण पतसंस्थेच्या अनुभवाला याचिकार्ते सावंत, शिंदे यांनी आक्षेप घेतला होता. अर्ज दाखल करताना पडळकर यांनी खोटी कागदपत्रे साजर केली होती, असा आक्षेप माजी सावंत यांनी घेतला होता. तसेच पडळकर यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती.

निवडणुकीतील रंगत वाढणार

गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्तिप्रदर्शन करत विरोधकांना डिवचले होते. त्यांचा उमदेवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर विरोधकांनी जल्लोष केला होता. आता पुन्हा पडळकरांचा अर्ज वैध ठरल्याने जिल्हा बँकेची निवडणूक रंगदार होणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT