

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवैध ठरवला आहे. न्यायमूर्ती ब्रह्मे यांनी हा निर्णय दिला. 2 वर्ष संचालक नसणे व अनुभव दाखल या मुद्द्यावर न्यायालयाने अर्ज अमान्य ठरवल्याचे समजते. काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी याचिका दाखल केली होती.
पडळकर यांचा अर्ज अवैध ठरणे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तडजोडीचा मार्ग मोकळा होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या निकालानंतर "न्यायव्यवस्था जिवंत आहे. ज्यांनी ज्यांनी खोटी कागदपत्र देण्यासाठी मदत केली आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत", अशी मागणी याचिकाकर्ते माजी आमदार विक्रम सावंत यांनी केली आहे. आता पडळकर काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे आहे.
बातमी अपडेट होत आहे...
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.