BJP MLA Gopichand Padalkar declines felicitation from NCP's Rohit Pawar during a public event, stirring political buzz. sarkarnama
महाराष्ट्र

Pawar Vs Padalkar : रोहित पवार-गोपीचंद पडळकर आमने-सामने; तणाव अन् सत्कार..., मध्यरात्री काय घडलं?

Rohit Pawar Gopichand Padalkar : आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्यरात्री १२ वाजता चौंडी येथील महादेवाच्या मंदिरात पूजा व महाआरती केली

Roshan More

Rohit Pawar News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशब्दी जयंती निमित्त चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या दर्शनासाठी आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर हे शुक्रवारी मध्यरात्री आमनेसामने आले. दोघे आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. रोहित पवारांकडून चौंडी येथे महापूजा करण्यात आली तर पडळकर यांच्याकडून फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

रोहित पवारांकडून गोपीचंद पडळकर यांच्या सत्काराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पडळकर यांनी सत्कार स्वीकारला नाही.यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, 'आपली संस्कृती आणि परंपरा आहे की, आपल्या भूमीमध्ये जे कोणी पाहुणे असतील त्यांचा पाहुणचार करण्याची आपली जबाबदारी असते. खासदार आणि आम्ही सत्काराचे साहित्य तेथे आणलं होतं. ते (गोपीचंद पडळकर) बिजी असल्यामुळे, कार्यकर्त्यांमध्ये असल्याने सत्कार घेऊ शकले नाहीत. परंपरा जपणे, वाद न घातला एकोप्याचा, बंधुभावाचा संदेश देणे हे महत्त्वाचे असते.'

सरकार अहिल्यादेवींच्या विचारांचे

गोपीचंद पडळकर म्हणाले, 'लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. आनंदाचे वातावरण आहे. अहिल्यादेवींचा विचारच भारताला, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो. त्या विचारामध्ये तेवढी ताकद आहे.केंद्र सरकार, राज्य सरकार अहिल्यादेवींच्या विचाराने कृतीतून काम करत आहे. याच पद्धतीने काम सुरू ठेवावे अशी आमची विनंती आहे.'

मध्यरात्री महापूजा

आमदार रोहित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त मध्यरात्री १२ वाजता चौंडी येथील महादेवाच्या मंदिरात पूजा व महाआरती केली आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT