Dhule Cash Controversy : 'धुळे कॅश' प्रकरणात आमदार अर्जुन खोतकरांच्या पीएच्या अडचणी वाढल्या, पोलिस अधिक्षकांना अहवाल सादर होताच मोठी कारवाई

FIR Filed Against Kishor Patil : धुळे कॅश प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार हे गेले नऊ दिवस या प्रकरणाचा तपास करत होते.
Arjun Khotkar & Anil Gote
Arjun Khotkar & Anil GoteSarkarnama
Published on
Updated on

Dhule Cash Case: विधिमंडळ अंदाज समितीचा दौरा नुकताच धुळे आणि नंदुरबारला झाला. या समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्यासाठी पैसे गोळा करण्यात आल्याचा आरोप झाला होता. धुळेच्या शासकीय विश्रामगृहातून कॅश सापडल्याने खळबळ उडाली होती. माजी आमदार अनिल गोटे यांनी विश्रामगृहाच्या खोलीत कॅश होती त्याला खोलीला टाळे ठोकले होते. राज्यभर या प्रकरणाची चर्चा झाली.

ज्या खोलीत कॅश सापडली. ती एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमदार आणि विधिमंडळ समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बूक होती. त्या खोलीतून तब्बल 1.84 कोटी रुपये पोलिसांनी जप्त केले होते.

धुळे कॅश प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार हे गेले नऊ दिवस या प्रकरणाचा तपास करत होते. विश्रामगृहातील नोंदवही आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले होते. या तपासानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना अहवाल सादर केला.या अहवालानंतर पोलिसांनी किशोर पाटील, राजू मोगरे यांच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Arjun Khotkar & Anil Gote
Congress News: 'ईव्हीएम' घोटाळा-बिटाळा काही नाही, आपणच...; काँग्रेसच्या नेत्याचं खळबळजनक विधान

गुन्हादाखल करण्याआधी कायदेशीर अभिप्राय घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपाधीक्षक राजकुमार उपासे हे करीत आहेत. प्राप्तिकर विभागातर्फे स्वतंत्र तपास करण्यात येणार आहे.

अनिल गोटे 'अ‍ॅक्शन मोड'वर

विश्रामगृहात कॅश असल्याचे आणि ती विधीमंडळ अंदाज समितीच्या सदस्यांना वाटप करण्यात येण्याबाबत माजी आमदार अनिल गोटे यांनी आरोप केला होता. त्यांनीच हे प्रकरण उजेडात आणले.विश्रामगृहावर ठिय्या देत किशोर पाटील यांच्या कक्षात पाच कोटी रुपये असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांपासून तर पोलिस अधीक्षक आणि विविध यंत्रणांना त्यांनी फोन करून याबाबत कळविले. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अजुनही ते या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत.

गोटेंकडून खोतकर टार्गेट

कॅश प्रकरणात अनिल गोंटेंनी आमदार अर्जून खोतकर यांना टार्गेट केले आहे. खोतकरांच्या पीएच्याच्या नावे विश्रामगृहातील कक्ष क्रमांक 102 हा 15 मे पासून आरक्षित होता. 15 ते 21 मे दरम्यान अर्जुन खोतकर आणि अंदाज समिती यांच्यासाठी विविध शासकीय अधिकारी, कंत्राटदार आणि यंत्रणांकडे पैशाची मागणी करण्यात आली. त्यासाठी पंधरा कोटी रुपयांचे टार्गेट होते, असा दावा माजी आमदार गोटे यांनी केला होता. आता या प्रकरणात खोतकरांच्या पीएवर गुन्हा दाखल झाल्याने स्वतः खोतकर अडचणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकरणाशी आपला काहीच संबंध नाही. आपण दौऱ्यावर असताना विश्रामगृहाकडे फिरकलो देखील नाही, असे स्पष्टीकरण अर्जुन खोतकर यांनी आधीच दिले होते.

Arjun Khotkar & Anil Gote
Satej Patil :''गोकुळमध्ये आता अवकाळी पाऊस झाला, पुढे पूर, महापूर येणार'', सतेज पाटलांचे भाकीत!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com