Jayant Patil Vs Gopichand Padalkar Sarkarnama
महाराष्ट्र

Padalkar vs Patil : गोपीचंद पडळकरांची 'ती' चूक, जयंत पाटलांनी तोंडावर सुनावलं, 'अभ्यास करा...'

Sangali Politics Jayant Patil Gopichand Padalkar: कट्टर विरोधक गोपीचंद पडळकर, जयंत पाटील एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी आमदार सतेज पाटील, आमदार हर्षदा देशमुख देखील उपस्थित होते.

Roshan More

Jayant Patil News : सांगलीच्या राजकारणातील कट्टर विरोधक आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार, माजी मंत्री जयंत पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर आले होते. वाळवा तालुक्यातील बावची गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी पाटील, पडळकरांसह या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील, आमदार हर्षदा देशमुखही उपस्थित होत्या.

गोपीचंद पडळकर यांचे आगामन होताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जयंत पाटील यांचे समर्थक देखील त्याच वेळी घोषणाबाजी करत होते. त्यावेळी जयंत पाटलांनी माईक हाती घेत आपल्या दारात कोणी आलं तर त्याचा सन्मान करायचा असतो, असे आवाहन केले.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'अफझलखान लाखोचे सैन्य घेऊन पन्हाळगडाच्या पायथ्याशी आला. इतका तो माजलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराज नियोजनामध्ये एकदम परफेक्ट होते. अफझनखानाच्या आतडी वेगळी बाहेर काढल्याशिवाय महाराज गप्प बसले नाहीत.'

अभ्यास करा...

दरम्यान, जयंत पाटलांनी आपल्या भाषना दरम्यान, पडळकरांची चूक लक्ष्यात आणून देत. त्यांना टोला लगावला. ते म्हणाले, 'अफझल खानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर नाही तर प्रतापगडावर बाहेर काढला. पुढच्या वेळी चांगला अभ्यास करून.. पाठ केलेले भाषण असलं की असं होतं.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT