LPG Cylinder Price Cut  Sarkarnama
महाराष्ट्र

LPG Cylinder Price Cut : सरकारचा मोठा निर्णय! LPG सिलिंडरचे दर घटले! आता 'या' किंमतीत मिळणार!

Government Reduces LPG Cylinder Price : इराण अमेरिका युद्धामुळे एसपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. मात्र, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दारात घट करण्यात आली आहे.

Roshan More

LPG Cylinder News : सरकारने महिन्याच्या पहिल्याच दिवशी आंनदाची बातमी दिली आहे. अमेरिका इराण युद्धामुळे एलपीजी गॅस सिलेंडरच दर वाढले होते. मात्र, आता युद्ध थांबल्याने सरकारने मोठा निर्णय घेत व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट केली आहे. नव्या दरानुसार एलपीजी गॅस सिलिंडर 192 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

सरकारच्या या निर्णयाचा फायदा थेट व्यापाऱ्यांना, हाॅटेल चालकांना होणार आहे. ज्या प्रमाणे व्यवसायिक सिलेंडरचे दर कमी झाले त्या प्रमाणे घरगुती सिलेंडर कधी स्वस्त होणार याचे गृहिणींचे लक्ष लागले आहे.

नव्या दरानुसार, 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडरची किंमत 192 रुपयांनी कमी झाली आहे. त्यानुसार आता दिल्लीत हा LPG सिलेंडर २७३८ रुपयांना मिळणार आहे. तर, बिहारमधील पटनामध्ये 3018 रुपयांना मिळणार आहे.

घरगुती सिलेंडरचे दर काय?

सरकारकडून अजून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर दरात बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. मुंबईमध्ये सिलेंडर ९४१.५० रुपयांना उपलब्ध आहे. बेंगळुरूमध्ये ९४४.५० रुपये, अहमदाबाद आणि गुरुग्राममध्ये ९४९ रुपयांना उपलब्ध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT