GBS Death Sarkarnama
महाराष्ट्र

GBS Death : राज्यात ‘GBS’चा पहिला बळी; लक्षणांकडे दुर्लक्ष पडले महागात?

Guillain Barre Syndrome Pune Solapur : पुण्यातील रुग्णांची संख्या ७० वर पोहचल्याने चिंता वाढत चालली आहे.

Rajanand More

Pune News : गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) या आजाराने महाराष्ट्रात पहिली बळी घेतला आहे. सोलापुरात उपचार सुरू असताना एका तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. या तरुणाला पुण्यात जीबीएसची लागण झाली होती. त्यानंतर तो गावी गेला होता. तिथेच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रामध्ये जीबीएसचे सर्वाधिक ७० रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात तर केवळ तीन रुग्ण उर्वरित जिल्ह्यांत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून शनिवारी देण्यात आली होती. या रुग्णांपैकी 14 जण व्हेंटिलेटरवर होते. रविवारी या आकड्यांमध्ये बदल झालेला असू शकतो.

दरम्यान, मृत्यू झालेला तरुण पुण्यात वास्तव्याला होता. त्याला 11 जानेवारीला अतिसाराची लक्षणे सुरू झाली. तो मुळचा सोलापूरचा असल्याने नंतर गावी गेला. तिथे जास्त त्रास झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जवळपास पाच दिवस आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, शनिवारी सांयकाली या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समजते.

पुण्यात हा तरुण सिंहगड रस्ता परिसरात राहत होता. याच भागात पुण्यात अधिक नागरिकांमध्ये जीबीएसची लक्षणे दिसून येत आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत पुणे मनपा कार्यक्षेत्रात 11 तर ग्रामीण भागा 44 रुग्ण होते. पिंपरी चिंचवडमध्ये मनपा भागातही 15 रुग्ण होते. राज्यात एकूण 73 रुग्णांपैकी 47 पुरूश व 26 महिला रुग्ण आहेत.

मोफत उपचार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस या आजारावर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती रविवारी दिली. पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून जीबीएस आजारावरील उपचारासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जावू नये, असे आवाहनही पवारांनी केले. 

काय आहेत लक्षणे?

-    श्वसनास त्रास होणे

-    हातापायांना झिणझिण्या येणे

-    रक्तदाबाची समस्या निर्माण होते

-    चालताना अडचण येणे

-    चेहऱ्यावर कमजोरी येणे

-    अतिसार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT