Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या मुजोर पदाधिकाऱ्याला अजितदादांनी भरला सज्जड दम; कारवाई करणार?

NCP Leader Baburao Chandre Assaults Senior Citizen: मारहाण केलेली क्लिप मला पाहायला मिळाली. हे अत्यंत चुकीचा असून कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. तो अधिकार कोणालाही आपण दिला नाही. त्यामुळे मी आज सकाळी बाबुराव चांदेरे यांना फोन केला होता....
NCP Leader Baburao Chandre Assaults Senior Citizen
NCP Leader Baburao Chandre Assaults Senior CitizenSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या बाबुराव चांदरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बाबुराव चांदेरे हे एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करताना दिसतात.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी या मारकुट्या पदाधिकाऱ्याला चांगलंच फटकारलं. पक्षांमध्ये असलं काही खपवून घेणार नाही, असा सज्जड दम देखील अजित पवार यांनी भरला.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बाबुराव चांदेरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असून ते माजी नगरसेवक आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. या अगोदर देखील बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

NCP Leader Baburao Chandre Assaults Senior Citizen
Pratap Sarnaik: महायुतीत अजब 'कारभार': मंत्र्याला न विचारताच अधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय; सामान्यांना फटका

या प्रकरणावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, मारहाण केलेली क्लिप मला पाहायला मिळाली. हे अत्यंत चुकीचा असून कुणालाही कायदा हातात घेता येत नाही. तो अधिकार कोणालाही आपण दिला नाही. त्यामुळे मी आज सकाळी बाबुराव चांदेरे यांना फोन केला होता. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही, त्यामुळे त्यांच्या मुलाशी बोलणं झालं, त्यांनी बाबुराव चांदेरे हे बाहेर गेले असल्याचं सांगितलं.

मात्र जी काही क्लिप मी पाहिली ते अजिबात बरोबर नाही असं मी त्यांच्या मुलाला सांगितलं आहे. अशा पद्धतीचे कृत्य हे कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्यास मी ते खपवून घेणार नाही. बाबुराव चांदेरे यांना मी बोलून या मागचं कारण काय ? याबाबत जाब विचारणार आहे. तसेच ज्यांना कोणाला मारहाण झाली त्यांनी पोलिसांमध्ये कंप्लेंट केल्यानंतर कारवाई देखील होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com