Maharashtra Politic's : लोकसभेनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या भाजपने विधानसभेत मोठं कारस्थान केलं; काँग्रेस नेत्याने गणितच मांडले

Congress Leader Statement : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद होता. आम्ही जेवढं ग्राऊंडवर फिरलो, तेवढं ना निवडणूक आयोग फिरला ना भाजपवाले फिरले. शांतीत क्रांती करू, असं लोकं आम्हाला म्हणत होते.
Congress-BJP
Congress-BJPSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 January : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पायाखाली जमीन सरकली आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी कटकारस्थान केलं, हे आम्ही आकडेवारीसहित तुमच्यासमोर मांडतोय. चार महिन्यांत इतके मतदार कसे वाढले? निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत, असा आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.

सोलापुरात माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे यश आणि विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव याबाबत भाष्य केले आहे. तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत परखड मत व्यक्त केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त हे भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागत आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.

त्या म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सायंकाळी पाच वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतदान वाढलं आहे, त्या विरोधात आम्ही तक्रारही केली आहे. पण, आम्हाला अजून यादी मिळाली नाही. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. पण, निवडणूक आयुक्त हे भाजप कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. अनेक आंदोलन केली, तरी काहीही सोक्षमोक्ष लागायला तयार नाही. कारण आयुक्त राजीव कुमार हे भाजप कार्यकर्त्यासारखं वागत आहेत.

Congress-BJP
Vasant Purke : माजी मंत्री पुरकेंनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान; ‘अजूनही काहींना सत्तेत असल्यासारखं वाटतंय’

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काहीतरी गडबड झाली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद होता. आम्ही जेवढं ग्राऊंडवर फिरलो, तेवढं ना निवडणूक आयोग फिरला ना भाजपवाले फिरले. लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली होती. शांतीत क्रांती करू, असं लोकं आम्हाला म्हणत होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या पायाखाली जमीन सरकली आणि त्यांनी विधानसभा निवडणुकीत कटकारस्थान केलं, असा दावाही प्रणिती शिंदे यांनी केला.

खासदार शिंदे म्हणाल्या, पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी करण्यात आलेल्या बॅनरबाजीवरूनही प्रणिती शिंदे यांनी भाजपला टार्गेट केले आहे. त्या म्हणाल्या, भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेली नाही. निवडणूक काळात देखील आचारसंहिता भंग करण्यात आली होती. आम्ही वारंवार तक्रार केली; पण कोणतीही कारवाई झालेली नाही

Congress-BJP
Pratap Sarnaik: महायुतीत अजब 'कारभार': मंत्र्याला न विचारताच अधिकाऱ्यांनी घेतला मोठा निर्णय; सामान्यांना फटका

फडणवीस हे तर ईव्हीएम सीएम

खासदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम सीएम आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com