Eknath khadse, Girish Mahajan, Gunratn sadavarte  Sarkarnama
महाराष्ट्र

Sadavarte Khadse controversy : सदावर्तेंनी खडसेंना सुनावले; म्हणाले, 'महाजनांची माफी मागितली नाही तर थेट....'

Political News : या वादात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. सदावर्ते यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : माजी मंत्री एकनाथ खडसे अन मंत्री गिरीश महाजन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून आडवा विस्तवही जात नाही. दोघेंही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच रविवारी खडसे यांनी महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे. खडसेंनी केलेले आरोप महाजन यांनी फेटाळले आहेत. आरोप सिद्ध झाला तर राजकीय संन्यास घेण्याची तयारी दर्शवली आहे.

दुसरीकडे महाजन यांच्या समर्थनार्थ महायुतीच्या नेते उतरले असून त्यांची बाजू लावून धरली असतानाच आता या वादात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली आहे. सदावर्ते यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत येत्या काळात महाजन यांची माफी न मागितल्यास थेट मी राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा दिला आहे.

एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. खडसे यांनी केलेल्या आरोपांनंतर गिरीश महाजन (Girish Mahajan) देखील आक्रमक झाले आहेत. खडसेंनी एकजरी पुरावा दिला तर मी राजकारण सोडेल असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच मी जर एकनाथ खडसे यांची एक गोष्ट बाहेर काढली, तर त्यांना घराच्या बाहेर पडता येणार नाही, लोक त्यांना जोड्याने मारतील, असे महाजन यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपामुळे वातावरण तापले आहे.

या वादात उडी घेत गुणरत्न सदावर्ते यांनी खडसे यांच्यावर टीका केली. महिला अधिकारी या सावित्रीच्या लेकी असतात, तुम्ही त्यांना बदनाम करू नका, गिरीश महाजन यांना बदनाम करू नका, खडसे तुम्ही माफी मागा, जर माफी मागितली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार, असा इशारा यावेळी सदावर्ते यांनी दिला आहे.

खडसे यांचे हे वागणे, 'सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली' असे आहे. त्यांची वैचारिक दिवाळखोरी झाली आहे, राज्यपालांकडे 100 कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी केस पेंडिग आहे. त्यांचा खोटा बुरखा फाडला जाईल, अशा शब्दात सदावर्ते यांनी त्यांचा समाचार घेतला.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT