BJP office : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला; कर्मचाऱ्यावर तलवारीने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

BJP ex corporator office vandalized : शनिवारी (ता.06) रात्री काही अज्ञातांनी भाजपच्या माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हातात धारधार तलवारी घेतलेल्या हल्लेखोरांनी ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
BJP ex corporator office vandalized
BJP ex corporator office vandalized Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 06 Apr : अंबरनाथमध्ये शनिवारी (ता.06) रात्री काही अज्ञातांनी भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकाचं ऑफिस फोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हातात धारधार तलवारी घेतलेल्या हल्लेखोरांनी ऑफिसमध्ये घुसून तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साम टिव्हीने दिलेल्या माहितीनुसार अंबरनाथमधील भाजपचे (BJP) माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या ऑफिसवर हा हल्ला झाला आहे.

BJP ex corporator office vandalized
Walmik Karad Threat : संतोष देशमुखांपेक्षा जास्त हाल करून मारल, कारागृहातून वाल्मिक कराडची धमकी? महादेव गित्तेच्या बायकोने सगळचं सांगितलं

10 ते 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या या हल्ल्यात ऑफिसचं मोठं नुकसान झालं आहे. तर यावेळी ऑफिसमधील एका कर्मचाऱ्यावर देखील तलवारीने हल्ला केला आहे. पण हे हल्लेखोर नेमके कोण होते आणि त्यांना हल्ला का केला? याबाबतची माहिती समोर आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक रोहित राजू महाडिक यांच्या अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोडवरील स्वानंद शॉपिंग कॉम्प्लेक्स शेजारी असलेल्या कार्यालयात शनिवारी रात्री अचानक तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात तलवारी घेतलेलं टोळकं शिरलं.

BJP ex corporator office vandalized
Manikrao Kokate : "मी माझ्या मित्राशी मस्करीत..."; कृषीमंत्री कोकाटेंचं शेतकऱ्यांबाबत आधी वादग्रस्त वक्तव्य नंतर सारवासारव, नेमकं काय म्हणाले?

यावेळी त्यांनी ऑफिसच्या काचा फोडल्या खुर्च्यांवर देखील तलवारीने वार केले. या संपूर्ण हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com