Bjp News : वर्धापन दिनानिमित्त राजकारणाच्या पलीकडचे नातं! भाजपच्या स्नेहमेळाव्यात पोहचले काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते

BJP anniversary event News : पुण्यात भाजप वर्धापन दिनानिमित्त या सर्वपक्षीय नेतेमंडळीने राजकारणाच्या पलीकडचे हे अनोखे नातं जपत वेगळा संदेश दिला.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपच्या 45 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रविवारी कोथरूड येथील शहर कार्यालयात स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भाजपच्या स्नेहमेळाव्यात काँग्रेस पक्षासह इतर पक्षातील नेत्यांची मोठी मांदियाळी होती. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी भाजप कार्यालयात जाऊन भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.

इतर वेळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची व टीकेची तोफ डागणारे सर्व पक्षीय नेते रविवारी मात्र एकाच मंचावर दिसत होते. या वर्धापन दिनानिमित्त या सर्वपक्षीय नेतेमंडळीने राजकारणाच्या पलीकडचे हे अनोखे नातं जपत वेगळा संदेश दिला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थितीत होते. या मंत्र्यांसोबतच भाजपचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या मेळाव्याला हजेरी लावली होती. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी भाजपच्या शहर कार्यालयात मोठी गर्दी जमली होती.

BJP Flag
BJP office : भाजपच्या माजी नगरसेवकाच्या ऑफिसवर हल्ला; कर्मचाऱ्यावर तलवारीने वार, घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

नेहमीच एकमेकावर टीका-टिप्पणी व आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या नेतेमंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच एका व्यासपीठावर आली होती. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावत एकमेकांच्या गाठीभेटी घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी काँग्रेसचे नेते मोहन जोशी, रमेश बागवे यांनी भाजपच्या (Bjp) शहर कार्यालयात जाऊन नेतेमंडळींना शुभेच्छा दिल्या.

BJP Flag
Devendra Fadnavis: भिसे कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतली मोठी जबाबदारी; 'त्या' दोन चिमुकल्या मुलींचा उपचार..

दुसऱ्या बाजूला, भाजपच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या वर्धापनदिना निमित्त सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

BJP Flag
BJP Presidents List : संसदेत 2 खासदार ते जगातला सर्वात मोठा पक्ष! 'या' पक्षाध्यक्षांनी भाजपला आणले सुगीचे दिवस

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com