Gunratna Sadavarte Sarkarnama
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte : 'माझी हत्या झाली तर…यांना जबाबदार धरा'' गुणरत्न सदावर्तेंनी घेतली राज्यातील 3 महत्वाच्या नेत्यांची नावे

Gunratna sadavarte On raj Thackeray, Uddhav Thackeray and Shard Pawar : कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांना येणाऱ्या धमक्यांवरून ते चांगलेच संतापले आहेत. यावरून त्यांनी जर आपली हत्या झालीच तर राज्यातील तीन महत्वाच्या नेत्यांना जबाबदार धरावे असे म्हटलं आहे.

Aslam Shanedivan

Mumbai News : राज्यात निघालेल्या मराठा आरक्षण मोर्चा असो किंवा नुकताच होणारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हिंदीसक्ती विरोधातील मोर्चा याला कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी मोठा विरोध केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई मोर्चा विरोध करताना त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तर आताही त्यांनी हिंदीसक्तीच्या मोर्च्याविरोधात वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. यानंतर त्यांना धमक्या मिळत आहेत. तसेच त्यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. यानंतर आता सदावर्ते यांनी, आपली हत्या केली जाऊ शकते, अशी भीती व्यक्त केली आहे. तर असे झाल्यास हत्तेसाठी राज्यातील तीन प्रमुख नेत्यांना जबाबदार धरावे असेही त्यांनी म्हटलं आहे. यामुळे आता नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

सदावर्ते यांनी, ‘आपल्याला हत्या करण्यापर्यंत धमक्या मिळात असून लेकराबाळांना देखील अर्वाच्य शिवीगाळ करण्यात येत आहे. याबाबत आपण पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. ते काळजी घेतीलच, याची दखलही घेतील. पण, जो गरजते हैं वो बरसते नही. अशीच सध्याची अवस्था आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पाणी कम चाय असून त्यांना जनाधार नाही. हे दोघे गल्लीतले राजकारण करणारी माणसं आहेत, अशी टीका केलीय.

तसेच सदावर्ते यांनी 5 जुलैला आयोजित विजयोत्सव मोर्चावरून जोरदार टीका केलीय. विजयोत्सवाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करणार आहेत का? याचे उत्तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना द्यावं लागणार आहे. गरिबांची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत जातात, नगरपरिषदच्या किंवा आश्रम शाळेत जातात, त्या मुलांना 7 क्रेडिट मिळतील आणि इंग्रजी शाळेत जाणाऱ्या श्रीमंत मुलांना 12 क्रेडिट मिळतील. ही तफावत कोण भरून काढणार याचे उत्तर आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना द्यावे, असेही आवाहन सदावर्ते यांनी केले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ‘नॅशनल एज्युकेशन पॉलिसीची 3 भाषा शिकण्याचा निर्णय थांबण्याचा घाट घातला आहे. ज्याला आधीच उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. पण आता ढोंग करत आहेत. आणि या त्यांच्या ढोंगात राज ठाकरेही सहभागी झाले आहेत. त्यांची ही जोडी राजकारणासाठी गरीब मुलांचे नुकसान करणारी आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नतद्रष्ट असून ते मराठी शाळा बंद पडतील.

यावेळी त्यांनी कोणी माझी हत्या केल्यास त्यासाठी पूर्णपणे राज ठाकरे आणि यांचे कार्यकर्ते, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जबाबदार धरावे असे म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT