Ashok Chavan Amit Deshmukh  sarkarnama
महाराष्ट्र

Congress Vs BJP : 'अशोक चव्हाण खुर्चीत, नगराध्यक्ष उभे...'; काँग्रेस प्रवक्त्याने 'चव्हाण', 'देशमुख' पॅटर्नमधील फरक सांगितला

Hanumant Pawar Ashok Chavan Amit Deshmukh : काँग्रेस प्रवक्ते अशोक चव्हाण यांचा फोटो शेअर करत निशाणा साधला आहे. भोकर नगराध्यक्ष उभे आणि त्यांच्या खुर्चीत अशोकराव चव्हाण साहेब बसलेले, असे त्यांनी म्हटले आहे.

Roshan More

Congress Vs BJP : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गेल्या वर्षी लोकसभेच्या आधी काँग्रेसला सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली. तर,त्यांची मुलगी श्रीजया या भोकरमधून भाजपच्या तिकीटावर आमदार देखील झाली. अशोक चव्हाणांनी आपली ताकद दाखवत भोकर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आणली तसेच नांदेड महापालिकेत भाजपचा महापौर केला.

अशोक चव्हाण यांना सूर गवसला असल्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवरून अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांचे दोन वेगळे फोटो शेअर करत ‘चव्हाण’ आणि ‘देशमुख’ यांच्या लीडरशीपमधील फरक सांगत चव्हाण यांना डिवचले आहे.

पवार यांनी शेअर केलेल्या एका फोटोमध्ये भोकर नगरपरिषदेमध्ये अशोक चव्हाण आणि त्यांच्या कन्या आमदार श्रीजया चव्हाण या खुर्चीत बसलेल्या दिसत आहेत.तर, नगराध्यक्ष हे त्यांच्या मागे उभे राहिले असल्याचे दिसत आहेत, दुसऱ्या फोटो लातूर महापालिकेतील असून तेथे खुर्चीवर महापौर आणि उपमहापौर बसलेले आहेत. आणि आमदार अमित देशमुख हे महापौरांच्या शेजारी उभे राहिलेले दिसत आहेत.

पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा फरक आहे ‘चव्हाण’ आणि ‘देशमुख’ यांच्या लीडरशीपमध्ये. भोकर नगराध्यक्ष उभे आणि त्यांच्या खुर्चीत अशोकराव चव्हाण साहेब बसलेले. दुसरीकडे लातूर मनपात महापौर, उपमहापौर त्यांच्या खुर्चीत बसलेले आणि नेते अमित देशमुख साहेब बाजूला उभे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT