Harshavardhan Sapkal Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics : 'देवेंद्र फडणवीस औरंगजेबाइतकेच क्रूर, त्यांना शिवरायांचा इतिहास पुसायचाय', काँग्रेसची जहरी टीका

Harshavardhan Sapkal Criticizes Devendra Fadnavis : औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एक सारखाच आहे. राज्यात संतोष देशमुख सारख्या हत्या होत आहे. खासदारांच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. हा प्रकार दुर्दैवाने महाराष्ट्रात सुरू आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Roshan More

Congress Politics : औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. सदाकदा तो धर्माचा आधार घ्यायचा आणि तो क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत. सदाकदा ते धर्माचा आधार घेत आहेत. दुर्देवाने औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार समान आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, औरंगजेबाने स्वतःच्या भावांचा खून केला. दाराशिकवोचा खूनच केला नाही तर त्यांचे मुंडके कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवले. लहान भावावर विषप्रयोग करून त्याची हत्या केली. औरंगजेब सदा कदा धर्माच आधार घेत होता. तो कधीच हजला गेला नाही.हा क्रुर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रुर शासक आहेत. तेही धर्माच आधार घेत आहेत.

'औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एक सारखाच आहे. राज्यात संतोष देशमुख सारख्या हत्या होत आहे. खासदारांच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. हा प्रकार दुर्दैवाने महाराष्ट्रात सुरू आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते.', असे सपकाळ म्हणाले.

देवेंद्र फडणवीस धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उखडून टाका असे ते सांगत आहेत, याचा अर्थ यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असे देखील सपकाळ म्हणाले.

औरंगजेबाची कबर उघडण्याचा इशारा

हिंदुत्ववादी संघटनाकडून औरंजेबाची कबर उघडून टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद एकबोटे यांनी ही कबर उघडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT