Vidhan Parishad Election : ठाण्याच्या माजी महापौरांसह ही चार नावे शिवसेनेकडून आघाडीवर; कुणाला लागणार लॉटरी

Shivsena Candidate : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील चेहऱ्याला बळ दिले जाते की ग्रामीण भागातील इच्छुकाला संधी दिली जाते, हे पाहावे लागणार आहे, मात्र, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय मोरे यांचे नाव आघाडीवर असून नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहावे लागणार आहे.
Vidhan Parishad Election-Eknath Shinde
Vidhan Parishad Election-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 16 March : विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या (ता. 17 मार्च) शेवटचा आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून तिघांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात माजी आमदार दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. उर्वरीत दोन जागा ह्या मित्रपक्षाच्या असून एक जागा शिवसेनेची, एक राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. शिवसेनेच्या एका जागेसाठी ठाण्याच्या माजी महापौरांसह चार नावे आघाडीवर आहेत. यापैकी शिंदे कोणाला संधी देतात, हे पाहावे लागणार आहे.

विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) पाच जागांसाठी येत्या 27 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. पाच जागांपैकी तीन जागा ह्या भाजपच्या, तर एक जागा राष्ट्रवादीला आणि एक जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक जागांसाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. नंदूरबारचे माजी आमदार आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि नागपूरचे किरण पांडव यांचा त्यात समावेश आहे.

चंद्रकांत रघुवंशी हे विधान परिषदेचे सदस्य होते. सध्या ते नंदूरबारचे शिवसेनेचे (Shivsena) संपर्कप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. आमश्या पाडवी यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे त्यांची विधान परिषदेतील जागा रिक्त झाली आहे. आमश्या पाडवी हेही नंदूरबारचेच आहेत, त्यामुळे ती नंदूरबारलाच मिळावी, अशी रघुवंशी समर्थकांची मागणी आहे. त्यात कितपत यश येते हे येत्या चोवीस तासांत स्पष्ट होणार आहे.

Vidhan Parishad Election-Eknath Shinde
Vidhan Parishad Election : विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून विदर्भाला झुकते माप; पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय

ठाकरे गटाला त्यांच्याच शब्दांत उत्तर देणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचेही नाव विधान परिषदेसाठी चर्चेत आहे. महिला म्हणून म्हात्रे यांना संधी दिली जाते का हेही पाहावे लागणार आहे. नागापूरचे किरण पांडव हे विदर्भातील शिंदे सेनेचा प्रमुख मोहरा म्हणून ओळखला जातो. विदर्भातून किरण पांडव यांना पक्ष संधी देणार की नवीनच नाव पुढे आणणार, याची उत्सुकता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव आणि ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या नावाची चर्चाही विधान परिषदेसाठी होत आहे. ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. आगामी महापालिका निवडणुका लक्षात शिंदे हे ठाण्याचा गड मजबूत करण्यासाठी मोरे यांना संधी देणार का, याबाबत औत्सुक्य आहे.

Vidhan Parishad Election-Eknath Shinde
Prashant Paricharak : बावनकुळेंनी शब्द देऊनही प्रशांत परिचारकांना पुन्हा डावलले; विधानसभेला पंढरपुरातून माघार घेऊनही पदरी निराशाच

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील चेहऱ्याला बळ दिले जाते की ग्रामीण भागातील इच्छुकाला संधी दिली जाते, हे पाहावे लागणार आहे, मात्र, चंद्रकांत रघुवंशी आणि संजय मोरे यांचे नाव आघाडीवर असून नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडते, हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com