Sharad Pawar| Harshvardhan Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील तुतारीच वाजविणार ? शरद पवारांच्या भेटीनंतर राजवर्धन, अंकिता पाटलांनी ठेवले स्टेटस

Sachin Waghmare

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. महाविकास आघाडी व महायुतीची जागावाटपाची चर्चा सुरु असतानाच माजी मंत्री तथा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील व त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती घेणार, अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या अंकीता पाटलांनी व्हाट्सअपला तुतारीचे स्टेटस ठेवले असल्याने चर्चा जोरात सुरु आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहेत.

हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांकडून इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पोस्टरबाजी करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी पाटील आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीनंतर मोठ्या प्रमाणात पोस्टर व्हायरल केले जात आहे. गुरुवारी मुंबईत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन हर्षवर्धन पाटील पुढील भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील सुद्धा उपस्थितीत होत्या. त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, कन्या अंकिता पाटील यांनी व्हाट्सअपला तुतारीचे स्टेटस ठेवले असल्याने चर्चा जोरात सुरु झाली आहे.

गेल्या काही दिवसापासून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी हाती घेणार अशी चर्चा रंगली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसात त्यांनी शरद पवार यांची दोन ते तीन वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या शरद पवार गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असताना त्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा भेट घेतली असून या भेटीनंतर सकाळी निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT