MVA Politics Video : महाविकास आघाडीत ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, फाॅर्म्युला ठरला?

Congress Shivsena UBT Assembly Elections: संजय राऊत म्हणाले की, कोणी 100 कोणी 200 जागा लढणार असे आकडे घेऊन महाविकास आघाडीत चर्चा होत नाही. समाजवादी पक्ष कुठे जागा जिंकत असेल तर ती जागा त्यांना देऊ तसचं आमच्यासाठी देखील आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Sarkarnama
Published on
Updated on

MVA Politics : महायुतीमध्ये जागावाटप अजून झालेले नाही. महायुतीमधील पक्षांची चर्चा सुरू आहे. मात्र, महाविकास आघाडीने जागावाटपामध्ये आघाडी घेतली असून जागावाटप निश्चित झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे काँग्रेसपेक्षा कमी जागा लढणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या वाट्याला 110 जागा तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाट्याला 95 जागा येणार असल्याचे वृत्त 'साम टिव्ही'ने दिले आहे.

शिवसेना (यूबीटी) 95 जागांवर लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 83 जागांवर लढणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, मित्रपक्षांना देखील कसे सामावून घेता येईल यावर महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi
Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणी'मुळे सरकारवर आठवड्याला तीन हजार कोटींचे कर्ज?

महाविकास आघाडीत छोट्या पक्षांकडून सन्मानजनक जागा मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. 40 जागा महाविकास आघाडीत छोट्या पक्षांना सोडण्यात याव्यात, असे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ देत लहान पक्षांनी एकही जागा लढवली नव्हती. त्यामुळे डाव्या पक्षांसह, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्षाने विधानसभेच्या 40 जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे.

जिंकेल त्याची जागा

संजय राऊत म्हणाले की, कोणी 100 कोणी 200 जागा लढणार असे आकडे घेऊन महाविकास आघाडीत चर्चा होत नाही. समाजवादी पक्ष कुठे जागा जिंकत असेल तर ती जागा त्यांना देऊ तसचं आमच्यासाठी देखील आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व मतदारसंघात लढत आहोत हेच आमचे सुत्र आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले.

Mahavikas Aghadi
Nashik politics: 'गांधीगिरी'च्या माध्यमातून समीर भुजबळांचे आमदार कांदे यांना विधानसभेचे आव्हान?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com