Congress News : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराज घालायचे तसा जिरेटोप घातल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास स्वामी होते असा खोटा इतिहास योगी सांगत आहेत. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते पण जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. ह्याच योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा जिरेटोप घालून शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे.', असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
जिरेटोपाला अनन्यसाधारण महत्व आहे पण भाजपाचे नेते सातत्याने जिरे टोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत, याआधी पंतप्रधान मोदी यांनीही जिरेटोप घातला होता. जिरेटोप घालून छत्रपती शिवाजी महाराज व शिवप्रेमींचा अपमान करणाऱ्या योगींनी व मोदींनी जाहीर माफी मागावी', अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात सर्वच जाती धर्मांच्या लोकांना समान स्थान होते. सर्वधर्मसमभावाची हीच संकल्पना संविधानात आहे, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु आहे. भाजपाचे सरकार असतानाच या प्रवृत्तींनी डोके वर काढले आहे. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही पण आता मात्र या प्रवृत्तींचा कडलोट करा, असे देखील सपकाळ यांनी म्हटले.
भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल गरळ ओकण्याचे काम सुरु आहे. महाराजांचा अवमान करणारे कोरटकर, सोलापूरकर, कुलकर्णी यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही? भाजपाच्या राज्यात या प्रवृत्तींना पाठबळ दिले जाते, सुरक्षा पुरवली जाते व पुरस्कार देऊन सन्मानही केला जातो हे संताप आणणारे आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ब्राम्हण समाजात साखरेचे काम करतो, असे विधान केले होते. त्या विधानावरून सपकाळ म्हणाले, फडणवीस यांचे विधान एकांगी आहे. फक्त ब्राह्मण समाजच साखरेचे काम करत नाही तर समाजातील सर्व जाती महाराष्ट्र धर्मात अमृत ओतण्याचे काम करतात, महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी योगदान दिलेले आहे. ही कोणत्या एका जातीची ठेकेदारी नाही तर अठरापगड जातींचे योगदान आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.