Maratha News: बागल-शिंदे कुटुंबानं रचला मैलाचा दगड; मराठा समाजाच्या आचारसंहितेनुसार झाले पहिलं लग्न

Historic Milestone for the Maratha Community: केवळ दोनशे पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. यातून सामाजिक सुधारणेचा एक मोठा संदेश गेला.परतुर येथील डॉ. नक्षत्रा बागल आणि परभणी येथील डॉ. जगदीश शिंदे यांनी यावेळी लगीनगाठ बांधली.
Historic Milestone for the Maratha Community
Historic Milestone for the Maratha CommunitySarkarnama
Published on
Updated on

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यूनंतर अशा प्रकारच्या अनेक घटना उजेडात येत आहेत. सासरकडून सतत होणाऱ्या छळाला, पैशांच्या मागणीला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या आईवडीलांनी केला आहे.

वैष्णवींच्या मृत्यूनंतर हुंडाबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. आपल्या लेकींचा हुंडामुळे छळ होऊ नये, हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाजाने लग्नासाठी एक आचारसंहिता तयार केली आहे. या आचारसंहितेनुसार नुकताच एक विवाह झाला.

फटाके, कर्णकर्कश डीजे, प्रि-वेडिंग शूटसारख्या गोष्टींना विरोध दर्शविण्यात आला आहे. विवाहातील खर्च मुलगा व मुलीच्या दोन्ही कुटुंबांनी समान पद्धतीने वाटून घ्यावा असा ठराव मंजूर करण्यात आला. बैठकीत सामूहिक विवाहाला प्राधान्य देण्याचेही ठरवण्यात आले आहे. या सर्व नियमांचे पालन करुन करत जालना जिल्ह्यातील परतुर येथे पहिला साधा विवाह सोहळा नुकताच झाला.

या विवाह सोहळा मैलाचा दगड ठरला आहे, विवाह संस्थेत नवी परंपरा यानिमित्ताने सुरु झाली आहे. केवळ दोनशे पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा झाला. यातून सामाजिक सुधारणेचा एक मोठा संदेश गेला.परतुर येथील डॉ. नक्षत्रा बागल आणि परभणी येथील डॉ. जगदीश शिंदे यांनी यावेळी लगीनगाठ बांधली. नवरा-नवरी दोघेही डॉक्टर असल्याने त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Historic Milestone for the Maratha Community
'Madam N' And Influencer Spies: कोण आहे पाकिस्तानी हेरगिरांची 'आका' ISIची एजंट 'मॅडम एन; भारतात पसरवलं गुप्तहेराचं जाळं

बागल-शिंदे कुटुंबाने आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन करीत हुंडा न देता आणि डीजे न लावता साधेपणाने विवाह केला आहे. केवळ 200 पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, ज्यामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला. साखरपुडा कार्यक्रम होत असताना मराठा समाजाची बैठक झाली. यात साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पाडण्याचा निर्णय झाला. त्यांची अंमलबजावणी नक्षत्रा-जगदीश यांच्या विवाहात आली.

लग्नात हुंडाबंदी करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. पिंपरी चिंचवड शहरात काही दिवसापूर्वी सकल मराठा समाजाची बैठक झाली. बैठकीत हुंडा बंदीसाठी निर्णय घेण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमण्यात आली. मराठा समाजाच्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार केली. लग्नात अनावश्यक खर्च टाळणं, हुंडा न देणं, हुंडा घेणाऱ्यावर बहिष्कार टाकणं आणि सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करणं अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Historic Milestone for the Maratha Community
Vidarbha Politics: विदर्भात रस्सीखेच! ग्रामीण भागात काँग्रेस मजबूत, शहरी भागावर भाजपची पकड

मराठा समाजाने तयार केलेल्या आचारसंहितेमधील प्रमुख मुद्दे

  1. विवाह सोहळ्यातील अनावश्यक खर्च टाळून, मुलगा-मुलगी यांच्या नावे एफडी केली जाईल.

  2. काही रक्कम गरजवंतांना मदत स्वरूपात केली जाईल.

  3. वरातीमधील कर्णकर्कश डीजेचा आवाज आणि त्यावरील विभत्स नृत्य बंद केले जातील.

  4. प्रदूषण युक्त फटाके वाजवले जाणारं नाहीत. प्री-वेडिंग शूट टाळले जातील.

  5. विवाह सोहळा कमीत कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत होईल.

  6. विवाह सोहळ्याचा खर्च वर आणि वधू पक्षाने अर्धा-अर्धा करावा.

  7. ज्या कुटुंबामधे महिलांचा छळ होतो, हुंडा घेतला जातो त्या कुटूंबाशी रोटी- बेटी व्यवहार समाज करणार नाही.

  8. हुंडा घेणाऱ्या कुटुंबाला मराठा समाजातून बहिष्कृत केले जाईल.

  9. ज्या महिलेचा सासरच्या माणसांकडून छळ होत असेल, त्या महिलेच्या माहेरची मंडळी मुलीच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.

  10. कोणत्याही प्रकारचे ओंगळवाणे प्रदर्शन न मांडता विवाह सोहळे साधेपणाने आणि वेळेवर केले जातील.

  11. मानपानाचे सामाजिक प्रदर्शन केले जाणारं नाही. जावई मानासह सर्व मान कौटुंबिक स्वरूपात केले जातील.

  12. मराठा समाज सामूहिक विवाह सोहळ्यांना प्राधान्य देईल. विवाह सोहळ्यात एकच व्यक्ती आशीर्वादाचे भाषण देईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com