Shubhangi Shinde Suicide Case : बीडच्या शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; भाजपचा बडा नेता फरार

Beed suicide news : या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून पाचवा आरोपी असलेला भाजपचा बडा नेता फरार असल्याचे पुढे आले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
BJP Flag
BJP FlagSarkarnama
Published on
Updated on

Beed News : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची पुनरावृत्ती अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथे घडली. सासरच्या छळाला कंटाळून शुभांगी शिंदे या विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी आरोपी पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली आहे. या आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत असून पाचवा आरोपी असलेला भाजपचा बडा नेता फरार असल्याचे पुढे आले आहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.

बीडच्या शुभांगी शिंदे आत्महत्या प्रकरणातील पाचवा आरोपी हा भाजपचा (BJP) पदाधिकारी आहे. संदीप काचगुंडे असे फरार असलेल्या त्या आरोपीचे नाव आहे. काचगुडे हा भाजपचा धारूर तालुका अध्यक्ष असून सध्या फरार आहे. त्याचा पोलिस पथके शोध घेत आहेत.

BJP Flag
Devendra Fadnavis: ठाकरे बंधू एकत्र येणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला. या प्रकरणी सासरच्या लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.

BJP Flag
Raj Thackeray-Uddhav Thackeray : राज-उद्धव जवळ, पण 'मनसे' लांब; युतीसाठी 'ती' अट ठरतेय डोकेदुखी!

अंबाजोगाई आणि धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसऱ्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती. माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू केला होता. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये हुंड्यासाठी छळ केल्याचे म्हटले आहे.

BJP Flag
Raj Thackeray Pune Visit : 'मनसे'अध्यक्ष राज ठाकरे येणार पुण्यात ; युतीच्या चर्चांना फुलस्टॉप अन् स्वबळाची घोषणा होणार?

या प्रकरणात पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे, सासू सुमन शिंदे,ननंद सीमा शिंदे आणि पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीसह सासरा, सासू आणि नणंद यांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तर या प्रकरणातील भाजपचा पदाधिकारी संदीप काचगुंडे याला अटक करण्यासाठी पथक रवाना केल्याची माहिती बर्दापूर पोलिसांनी दिली.

BJP Flag
BJP vs Shiv Sena MNS : 'ठाकरे बंधू एकत्र येणार, पण तिथं अनेक 'शकूनी मामा''! मंत्री राणेंनी नेमकं कोणाला फटकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com