मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनास मनाई केल्याने वातावरण तापले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर मराठा समाजाचा अपमान केल्याचा आरोप केला आणि जातीद्वेष दाखवल्याचा सवाल उपस्थित केला.
Mumbai News : मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा हुंकार भरला आहे. त्यांनी मुंबईत आंदोलन करणारच अशी भूमिका घेतली असून ते उद्या (ता.27) आंतरवालीसराटी येथून निघणार आहेत. तर 29 ला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम आहेत. दरम्यान यांना आझाद मैदान नाकारत मुंबईत आंदोलन करता येणार नाही असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ज्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. यामुळे जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे नेते तथा माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी महायुतीचे सरकार हे मराठ्यांना बदमान करणारे असून असल्याचा इतका जातीद्वेस कशासाठी दाखवला जातोय, असा सवाल केला आहे.
जरांगे यांना मुंबईत येण्यास मनाई करण्यात आल्यानंतर त्यांनी न्याय व्यवस्थेवर विश्वास दाखवला. त्यांनी पुन्हा एकदा आपण न्यायालयाचे दार ठोठवणार असल्याचे सांगितले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यापाठोपाठ आव्हाड यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आरोपही केलेत.
आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये राज्य सरकारला धारेवर धरत, न मागता राज्य सरकारने परुशराम मंहामंडळ स्थापन केले. हेच सरकार मात्र मराठ्यांना मुंबईत येण्यास मज्जाव करत आहे. त्यामुळे हे सरकार एकाच समाजासाठी आहे का? असा सवाल केला आहे. तसेच महायुतीचे हे सरकार मराठ्यांना बदनाम करत असून इतका जातीद्वेस कशासाठी दाखवला जातोय असंही त्यांनी म्हटलं आहे.
अन्याय करू शकत नाही...
मराठा समाजाने आतापर्यंत काढलेले सगळे मोर्चे हे आदर्श असे होते. जगभरात त्या मोर्चांची चर्चा झाली. आताही ते त्यांच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत. हा त्यांचा अधिकार आहे. पण राज्यातले मायबाप सरकार ने मागण्यांच्याबाबत सकारात्मक पाहावे. सरकारने मराठ्यांच्या भूमिकेकडे त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करताना लक्षात घ्या राज्यातील एक मोठ्या समाजावर तुम्ही अन्याय करू शकत नाही. सरकार पक्षपातीपणाने वागू शकत नाही, असेही म्हणत आव्हाडांनी सरकारला फटकारले आहे.
प्रश्न 1: मनोज जरांगे यांनी काय निर्णय घेतला होता?
उत्तर: त्यांनी मराठा समाजासाठी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
प्रश्न 2: न्यायालयाने काय निर्णय दिला?
उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाने आंदोलनास मनाई केली.
प्रश्न 3: जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: त्यांनी सरकारवर मराठ्यांचा अपमान केल्याचा आरोप केला आणि जातीद्वेष दाखवल्याचा सवाल उपस्थित केला.
प्रश्न 4: या आंदोलनामुळे वातावरण का तापलं आहे?
उत्तर: आंदोलनास परवानगी नाकारल्यामुळे मराठा समाज आणि राजकीय वर्तुळात नाराजी वाढली आहे.
प्रश्न 5: पुढील पाऊल काय असू शकते?
उत्तर: जरांगे न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात आणि राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.