Jitendra Awhad News: शरद पवारांच्या खळबळजनक दाव्यानंतर काही तासांतच आव्हाडांची सरन्यायाधीश गवईंकडे मोठी मागणी

Election Commission : राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळाचे अनेक पुरावे समोर आणले आहेत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून ते रोज धक्के देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राहूल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला समर्थन दिले आहे.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळा आहे हा आमचा आरोप नाही तर दावा आहे. याकरिता आयोगाने राहूल गांधी यांना शपथपत्र मागण्याची गरज नाही. बंगालच्या एक माणसाच्या खोलीत 80 लोकं राहतात तर राम कमलदास नावाच्या माणसाला 45 पोर दाखवण्यात आली आहे. त्यांची सर्वांची नावे मतदारयादीत आहेत. निवडणूक आयोगासाठी एवढा पुरावे पुरेसे नाहीत का ? मग आत्ताच मतदारयाद्यांमध्ये ‘एरर' कसे यायला लागले अशी विचारणा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली.

राहुल गांधी यांनी महाराष्ट्राची विधानसभा भाजपने चोरल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांनी मतदारयाद्यांमधील घोळाचे अनेक पुरावे समोर आणले आहेत. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारून ते रोज धक्के देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राहुल गांधी यांच्या मत चोरीच्या आरोपाला समर्थन दिले आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता निवडणुकीची गरजच राहिली नाही, निवडणूक घेण्यापेक्षा निवडणूक आयोगाने निकालच जाहीर करावा. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commssion) घोळाची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मतदारयाद्यांमध्ये नोव्हेंबर 2024 पासूनच घोळ सुरू झाला होता. हे मी वारंवार सांगत होते. निवडणूक आयोगाच्या समितीतून सरन्यायाधिशांना वगळले तेव्हापासून या कटाला सुरुवात झाली होती. हा कट आता उघडकीस आला आहे. सर्वच पक्षांनी मतदारयाद्यांचा शोध घेतला जात आहे. पडताळणी करण्यास सांगताच आता वेबसाइटवरून मतदार याद्याच गायब केल्या जात आहेत. ऑन लाइन शोध घेतल्यास एरर दाखवल्या जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Jitendra Awhad
Devendra Fadnavis News: राहुल गांधींनंतर शरद पवारांचाही निवडणूक प्रक्रियेवर संशय; फडणवीसांचा 'पळपुटे' उल्लेख करत जोरदार पलटवार

आमचे आरोप खोटे असतील तर निवडणूक आयोगाला एवढी लपवाछपवी करण्याची काही गरज नव्हती. चोर के दाढी मे तिनका अशी परिस्थिती आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधारी पक्षाच्या हातातील बाहुले झाले आहेत. पक्षांतर कायदा पायदळी तुडवून पक्ष स्थापन करता येत नाही, या मूलभूत नियमाला फाशी देऊन कॉम्प्रमाईज करत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष ज्यांनी फोडले ते त्यांच्यात हातात सोपवले असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com