A video allegedly showing a government school headmaster holding a alcohol bottle and lying asleep inside a classroom has triggered outrage. Sarkarnama
महाराष्ट्र

Abhijeet Dipke news : वर्गातच मुख्याध्यापकाच्या हातात बाटली अन् झोपलेल्या अवस्थेतील व्हिडिओ आला समोर; अभिजीत दिपकेंचा आंदोलनाचा इशारा

Hingoli government school, headmaster video : ‘स्कूल ठीक करो’ मोहिमेत हिंगोलीतील सरकारी शाळेचा धक्कादायक प्रकार उघड; ग्रामस्थ संतप्त, निलंबन न झाल्यास मंगळवारी आंदोलनाचा इशारा.

Rajanand More

Education news : दिल्लीतील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने 'स्कूल ठीक करो' ही मोहीम हाती घेतली आहे. सरकारी शाळांमध्ये जाऊन तेथील पायाभूत सुविधांची झालेली दुरावस्था, शिक्षकांची कमतरता आदी मुद्द्यांवरून प्रशासनाला जाब विचारला जात आहे. या मोहिमेची सुरूवात होताच हिंगोली जिल्ह्यातील एका गावातील सरकारी शाळेतील मुख्याध्यापकांचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्वातंत्र्यदिनापासून हिंगोली जिल्ह्यातील आपल्या मुळ गावातून 'स्कूल ठीक करो' ही मोहीम सुरू केली. याचदरम्यान त्यांना त्यांच्या गावाशेजारी लिंबाला या गावातील मुख्याध्यापकांच्या कारनाम्यांची माहिती मिळाली. मद्यपी मुख्याध्यापकाविरोधात स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रार कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दीपके यांनी रविवारी सोशल मीडियात संबंधित मुख्याध्यापकाचे दोन व्हिडिओ पोस्ट केले आहेत. एका व्हिडिओमध्ये विद्यार्थी वर्गात असताना संबंधित मुख्याध्यापक झोपल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हे मुख्याध्यापक वर्गातून एक बाटली उचलून वर्गाबाहेर नेत असल्याचे दिसत आहे. दीपके यांनी ही मद्याची बाटली असल्याचा दावा केला आहे.

संबंधित मुख्याध्यापकांना तातडीने निलंबित करण्याची मागणी दीपके यांनी केली आहे. सरकारी शाळेत मद्यपी मुख्याध्यापक कसा असू शकतो? हा मुले आणि प्रामुख्याने लहान मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे, असे दीपके यांनी म्हटले आहे. त्याआधीत दीपके यांनी रविवारी सकाळी केलेल्या पोस्टमध्ये आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांकडून संबंधित मुख्याध्यापकाला निलंबित न केल्यास मंगळवारी आंदोलन केले जाणार आहे. त्या आंदोलनात आपणही सहभागी होऊ, असा इशारा दीपके यांनी दिला आहे. शाळेत पाच वर्ग असून केवळ दोनच शिक्षक आहेत. या मुद्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही, असेही दीपके यांनी म्हटले आहे. दरम्यान, दीपके यांच्याकडून शनिवारी एका शाळेतील स्वच्छतागृहातील दुरावस्थेचे व्हिडिओ पोस्ट करत सरकारला जाब विचारला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT