Pune News : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या वादाने राज्यात उग्र रूप धारण केले आहे. यावरून विरोधक सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. यावरून सत्ताधाऱ्यांनी तर कुणाल कामराला शिक्षा व्हावी अशी मागणी लावून धरली आहे. तर शिवसेनेकडून कुणाल कामराला धमकी दिल्या जातायत. अशातच आता, 'कुणाल कामराने समोर यावे, आम्ही त्याला संरक्षण देवू', असे वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेतील एका मंत्र्याने केले आहे. यामुळे सध्या तोडफोड, धमकी देणाऱ्या शिवसेना संरक्षण देणार यावर अनेकांना विश्वास बसत नसल्याची चर्चा रंगली आहे.
कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्यावर आधी एक गाणं आणि तोडफोडीनंतर पुन्हा दुसरं गाणं करूनवाद वाढवला आहे. यामुळे शिवसेना नेत्यांसह कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, त्याचे शो होवू देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. याचवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील टीका करत सध्या जे राज्यात सुरू आहे ते योग्य नसल्याचे म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कुणाल कामराही नडण्याच्या मुडमध्ये दिसत आहे. अशातच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया देताना मोठे भाष्य केलं आहे. कदम यांनी कुणाल कामरावर जोरदार टीका करताना, तो सध्या येथे नसून तामिळनाडूत आहे. हे एका संभाषणावरून समोर येत आहे. तर याने याच्याआधीही वारंवार सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्यांचा अपमान केला आहे. तो अशी वक्तव्य वारंवार करत असून याआधीही एका गाण्यातून त्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आतातर सरकारची खिल्ली उडवणारे गाणं समोर आलं आहे. यामुळे त्याची मानसिक स्थिती ठीक नसावी, असा दावा कदम यांनी केला आहे.
कायद्यानुसार आम्ही कारवाई करतो आणि ती केली जाईल. पण कामराला तसं वाटतं नसेल तर तो त्याचा भ्रम आहे. त्याच्या वक्तव्यांची कायद्यानुसार चौकशी केली जाईल, त्याला बोलावलं जाईल. त्यामुळे त्याने सांगितल्या प्रमाणे चौकशीला सहकार्य करावे. समोर येवून आपली बाजू मांडावी, असे आवाहन केलं आहे.
तर कामरा याने चौकशीला सहकार्य करावे. त्याला पोलिसांनी कायद्यानुसार नोटीस बजावली आहे. कायद्यानुसार त्याला संरक्षण दिलं जाईल, त्याने चौकशीला सहकार्य करावे, असे आश्वासन कदम यांनी दिले असून शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोडीचं आपण समर्थन करत नसल्याचेही कदम यांनी म्हटलं आहे. तर दोष फक्त शिवसैनिकांचा नसून टाळी एका हाताने वाजत नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.