
Mumbai Political News : स्टँडप कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त विधान करणारे गाणे म्हटलं. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापवलं असून शिवसेनाही आक्रमक झाली आहे. आक्रमक शिवसैनिकांनी ज्या हॅबिटॅटमध्ये कुणाल कामरा याचा शो झाला त्याची तोडफोड केली.
यानंतर कामरानं पुन्हा एकदा शिंदेंना डिवचताना आपण माफी मागणार नाही, असे स्पष्ट करताना पुन्हा एक नवे गाणं पोस्ट केलं आहे. त्याने कंगाल होणार असं गाणं तयार करून शिंदे गटावर आव्हानच दिलं आहे. त्यामुळे शिवसेना पुन्हा आक्रमक झाली असून शिवसेना नेते राहुल कनाल यांनी कुणाल कामराला इशार दिला आहे. तर या पुढे मुंबईच काय महाराष्ट्रात कुणाल कामराचा शो होवू देणार नाही, असे म्हटलं आहे.
राहुल कनाल यांनी, यावेळी कुणाल कामरानं केलेल्या गाण्यावरून हॅबिटॅटच्या मालकाला फोन केल्याचे सांगितलं. त्यावेळी हॅबिटॅटच्या मालकाला याबाबत आपल्याला काहीच माहित नसल्याचे म्हटलं आहे. तर कामरानंचं बोलणे हे उर्मट पणाचे असल्यानेच शिवसैनिकांनी तोडफोड केली असेही त्यांनी म्हटल्याचे कनाल यांनी सांगितलं आहे.
कुणाल कामराला, दम असेल तर समोरा समोर येवून बोल. तू सांगशील ती जागा, तू सांगशील तो दिवस निवड. आमची तयारी आहे. पण आता या पुढे मुंबईच काय महाराष्ट्रात कामरानंचा कोणताही शो होवू देणार नाही असा इशाराही यावेळी राहुल कनाल यांनी दिला आहे.
तसेच राहुल कनाल यांनी कुणाल कामराचे महाराष्ट्रात जो कुणी शो चे आयोजन करतील त्यांनाही हा इशारा असून त्याचा शो आयोजित करू नका. अन्यथा शिवसेना स्टाईलने धडा शिकवला जाईल. त्यांनाही शिवसेनेच्या रोषाचा सामना करावा लागेल. त्यामुळे आता कुणाल कामराचे लपून न बोलता आमच्या समोर यावं. त्याच्यात हिंमत असेल तर समोरा-समोर येऊन चर्चा करावी, असेही आवाहन राहुल कनाल यांनी कुणाल कामराला दिले आहे.
तसेच कामरासारखी लोकं कोणाच्या प्रभावाखाली आहेत? ते रात्री बोलतात आणि सकाळी विसरून जातात. कामरा हा चावीच्या खेळण्या सारखा असून त्याला चावी द्याल तितका तो नाचतो, अशीही टीका राहुल कनाल यांनी केलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.