Kunal Kamra Politics: कुणाल कामरा विरोधात मुंबई बाहेर, नांदगावला पहिला गुन्हा दाखल!

Shivsena Nandgaon Leader Filed Case on Kunal Kamra: शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी म्हणतात, ‘ठाणे की रिक्षा’ यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला.
Kunal Kamra |Eknath Shinde
Kunal Kamra |Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी लिहिलेल्या विडंबनात्मक कवितेचे पडसाद देशभर उमटले आहेत. सध्या राजकीय वातावरण त्यामुळे चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांच्या तीव्र भावना आहेत.

कुणाल कामरा यांच्या ‘ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, आख पे चष्मा...’ या विडंबनात्मक गीताने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. त्यावर विधिमंडळातही जोरदार चर्चा झाली. मुंबई शहरात या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी स्टुडीओमध्ये तोड फोड करीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kunal Kamra |Eknath Shinde
ACB Trap: सुरगाण्याचा गट अधिकारी लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात अडकला!

त्याचे पडसाद आता राज्यातही उमटू लागले आहेत. मुंबई बाहेर नांदगाव शहरात या संदर्भात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नांदगाव शहराध्यक्ष सुनील जाधव यांनी यासंदर्भात नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून कुणाल कामरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.

Kunal Kamra |Eknath Shinde
Kishor Darade Politics: देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आता राज्य सरकारचाही जिल्हा बँकेला मदतीचा शब्द!

या संदर्भात श्री जाधव यांनी तक्रारीत कुणाल कामरा यांनी जाणीवपूर्वक हे गीत लिहिले आहे. एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. हे माहीत असून देखील त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी त्यांनी हे गीत लिहिले. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विषयी आमच्या मनात असलेला आदर आणि भावना दुखावल्या गेल्या आहेत.

विरोधी पक्षांचे मत देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबत कलुषित झाले आहे. नांदगाव शहरात पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात कुणाल कामरा याच्या अडचणी वाढू शकतात. या संदर्भात आपण माफी मागणार नसल्याचे कुणाल कामरा यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी कामरा यांना नोटीस देखील बजावली आहे. मात्र कामरा यांना अटक झालेली नाही. हे गीत समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर ते विविध वाहिन्यांवर देखील प्रसारित करण्यात आले. राजकीय विडंबन म्हणून सध्या ते देशभर हिट झाले आहे.

या गाण्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांना गद्दार असे संबोधण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने कामरा यांची बाजू घेत एकनाथ शिंदे पक्ष आणि सरकारवर टीका केली होती. त्यावरून एकनाथ शिंदे पक्षाच्या असंख्य नेत्यांनी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा याला फोनवरून धमकावले देखील आहे. या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरात गुन्हा दाखल झाल्याने कुणाल कामरा याला नांदगावच्या पोलीस ठाण्यात केव्हा बोलवतात याची उत्सुकता आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com