IAS Pooja Khedekar Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedekar : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरचं 'नगर कनेक्शन!'; 'त्या' 2 IMP प्रमाणपत्रांबाबत धक्कादायक माहिती समोर

Pooja Khedekar Update : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची चर्चा सुरु आहे. शिवाय त्यांच्या संदर्भातील दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत.

Jagdish Patil

Ahmednagar News, 13 July : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedekar) यांची चर्चा सुरु आहे. शिवाय त्यांच्या संदर्भातील दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. पूजा यांना अहमदनगरमधील जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्र दिव्यांग व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र देण्यात आल्याची मोठी माहिती समोर आली आहे.

अभिलेख तपासणीमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे. सन 2018 मध्ये नेत्र दिव्यांग प्रमाणपत्र तर 2020 साली मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं होतं. याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी माध्यमांना दिली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम (Washim) जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. तर दिवसेंदिवस त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे कारनामे समोर येत आहेत.

पूजा यांना अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून (Ahmednagar District Hospital) नेत्र दिव्यांक व मानसिक आजारपणाचे प्रमाणपत्र दिल्याचं बोललं जात होतं. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयकडून माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रांची तपासणी केली असता खेडकर यांना नेत्र दिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिल्याचे पुरावे आढळून आले आहेत. तत्कालीन वैद्यकीय मंडळाने 2021 मध्ये एकत्रित करून दोन्ही याचे प्रमाणपत्र दिल्याचे आता समोर आले आहे.

या प्रमाणपत्राबरोबर नॉन क्रिमीलेअरचे प्रमाणपत्र देखील संशयाचे फेऱ्यात अडकले आहे. त्यांनी एका मुलाखतीत आपले आई-वडील विभक्त असल्याचं म्हटलं होतं. परंतु त्यांच्या वडिलांनी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत अविभक्त कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. शिवाय या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण 40 कोटीहून अधिक मालमत्ता असल्याचंही नमूद केलं आहे.

मात्र, नॉन क्रिमिनलसाठी उत्पन्नाची मर्यादा आठ लाखापेक्षा कमी आहे. त्यामुळे आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देखील संशयाच्या फेऱ्यात अडकलं आहे. त्यामुळे खेडकर यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT