Maharashtra News : ट्रेनिंग कालावधीत मोठ्या मागण्या करणाऱ्या आयएएस पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण थांबवण्यात आले आले. याबाबत राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरीतून सूचना करण्यात आली आहे.
पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी येथे रिपोर्ट करा. 23 जुलैपूर्वी हजर व्हावेच लागेल, असे आदेशही खेडकर यांना दिले आहेत. राज्य सरकारने 11 जुलै रोजी दाखल केला सविस्तर अहवाल, त्यानंतर झालेली ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रोबेशन काळात एखाद्या ट्रेनी अधिकाऱ्यावर अशा प्रकारच्या कारवाईची ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर Pooja Khedkar यांच्याबाबत दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांचं कुटुंब सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
आयएएस होण्यासाठी पूजा खेडकर यांनी यूपीएससीची 11 वेळा परीक्षा दिली. ओबीसीतून परीक्षा देताना नॉन क्रिमीलेअरचा दाखला दिला. आता या दाखल्याची चौकशी जिल्हा महसूल प्रशासनाने सुरू केली आहे. याचदरम्यान, आता पूजा खेडकर यांना मोठा दणका मिळाला आहे.
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्यावर डीओपीटीने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात आला आहे. शिवाय पुढील कारवाईसाठी कुठल्याही परिस्थितीत तत्काळ लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी मसुरी येथे रिपोर्ट करा, असा आदेश 'डीओपी'ने दिला आहे.
या शिवाय 23 जुलैपूर्वी पूजा यांना हजर व्हावेच लागेल असा स्पष्ट आदेशही देण्यात आला आहे. पूजा खेडकर प्रकरणी राज्य सरकारने 11 जुलै रोजी सविस्तर अहवाल दाखल केला होता. त्यानंतर आता ही मोठी कारवाई पूजा खेडकर यांच्यावर करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.