Chhagan Bhujbal Politics : शरद पवार भेटीतून छगन भुजबळ यांना कोणतं 'नॅरेटीव्ह सेट' करायचंय?

Mahayuti Vs MVA : बारामतीमध्ये शरद पवारांवर टीका, मुंबईत येताच स्तुती ; 24 तासांत बदललेली भुजबळांची भूमिका चर्चेत
Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Chhagan Bhujbal, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Bhujbal OBC Politics : लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात पॉलिटिकल नॅरेटीव्ह सेट केल्याचा आरोप सातत्याने होत आहे. आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांच्या दोन टोकाच्या भूमिकेमुळे राज्यात संशयाचे वातावरण झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्षांकडून नवे नॅरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरू झाले नाही ना? अशी चर्चा जोरात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा नुकताच बारामती येथे झाला.

या मेळाव्यात चर्चा झाली, ती छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी संबंधित आरोपांची. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने बोलाविलेल्या बैठकीस विरोधी पक्षांचे नेते गैरहजर राहिले. यासंदर्भात बारामतीहून फोन आल्यानंतर हे घडल्याचा दावा भुजबळ यांनी केला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांच्या बारामतीतील मेळावा झाला. या मेळाव्यात भुजबळ यांनी शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ओबीसी नेते भुजबळ यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी शरद पवारांवर स्तुती सुमने उधळली.

मराठा समाज आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी नेते म्हणून पवार यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
NCP Hearing News : राष्ट्रवादी कुणाची? सुप्रीम कोर्टाचे अजित पवार अन् शरद पवार गटाला मोठे निर्देश

भुजबळ यांनी पवार Sharad Pawar यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या दावा या दोन्हीही राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरला. एकच दिवसात भुजबळ यांचे शरद पवार यांच्याबाबत मतपरिवर्तन झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठा आरक्षणाचा तिढा सातत्याने गुंतागुंतीचा झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते आणि ओबीसी आरक्षणाचे पदाधिकारी दोघेही आक्रमक आहेत. त्यामुळे काहीही निर्णय झाला तरी, या दोन्ही घटकांचे समाधान होणे अवघड आहे.

मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि त्यावर ओबीसी व मराठा आरक्षण लढ्यातील नेत्यांचे राजकारण अतिशय क्लिष्ट आहे. त्यात काहीही सूचना केली तरी ती वादाचा विषय ठरू शकते, अशी सूचना करणारा अडचणीत येऊ शकतो.

या संदर्भात निर्णय घेण्यात राज्य शासन महत्त्वाचे आहे. सध्या भुजबळ शासनाचा भाग आहेत. अशावेळी वादग्रस्त विषयावर निर्णयाचा चेंडू विरोधकांकडे टोलविणे हा देखील राजकारणाचा भाग असू शकतो.

या विषयाचे पडसाद निश्चितपणे विधानसभा निवडणुकीवर पडतील. यासंदर्भात सत्ताधारी पक्षाने काय निर्णय घेतला? कोणाला काय आश्वासन दिले? काय चर्चा केली? हे सर्वच गुलदस्त्यात आहे. अशा परिस्थितीत मंत्री भुजबळ या वादात विरोधी पक्षांनाही गुंडाळण्याची तयारी तर करीत नाही ना? असा संशय येणे स्वाभाविक आहे.

या माध्यमातून मंत्री भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना राजकीय धर्मसंकटात टाकून प्रचारासाठी पॉलिटिकल 'न्यारेटिव्ह' तर तयार करीत नाही ना? असेही बोलले जाते.

(Edited by Sunil Dhumal)

Chhagan Bhujbal, Sharad Pawar
Sharad Pawar : साहेब संधी द्या, डोक्यावर हात ठेवा, आबा बागुलांची शरद पवारांना साद !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com