IAS Pooja Khedkar Sarkarnama
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar : मोठी बातमी! पूजा खेडकरला मोठा झटका; IAS पद जाणार? UPSC गुन्हा दाखल करणार

Pooja Khedkar Controversy : यूपीएससीने पूजा खेडकरला नोटीस बजावताना तुमची निवड रद्द का करू नये असा सवालही नोटिसमध्ये विचारलं आहे. त्यामुळे आता खेडकर यांचे आयएएस हे पद जाण्याची शक्यता आहे.

Sachin Waghmare

Pooja Khedkar Fraud Case : यूपीएससीकडून पूजा खेडकर यांना मोठा झटका देण्यात आला आहे. पूजा खेडकर प्रकरणी यूपीएससीने त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सोबतच पूजा खेडकर यांचं आयएएस केडर रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीसदेखील बजावली आहे. यात यूपीएससीने पूजा खेडकर यांना तुमची निवड रद्द का करू नये असा सवालही नोटिसमध्ये केला आहे. त्यामुळे आता खेडकर यांचे आयएएस केडर पद जाण्याची शक्यता आहे.

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामध्ये निवड का रद्द करु नये असा सवाल करत गैरवर्तनप्रकरणी कारण दाखवा नोटीस बजावली आहे.

पूजा यांच्याविरुद्ध यूपीएससीने थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने ही माहिती प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे.  

शुक्रवारी सकाळीच पुणे पोलिसांनी त्यांना पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात हजर न राहिल्याने दुसरी नोटीस धाडली होती. दरम्यान, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अद्यापही वाशीम येथेच मुक्कामी असल्याची माहिती समोर येत आहे.

पूजा खेडकर लोकसेवा आयोगाने कठोर कारवाई करण्याच्य़ा उद्देशाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पूजा खेडकर यांची आयएएस म्हणून झालेली निवड रद्द होण्याची शक्यता आहे. खासगी गाडीवर अंबर दिवा गाडी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात केबिन, बनावट कागदपत्रं असे एक ना अनेक प्रताप पूजा खेडकर यांना भोवण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे आयएएस हे पदच धोक्यात आले आहे.

प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) पूजा खेडकर यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या 'उद्योगांची दखल घेत राज्य सरकारने त्यांचा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित केला आहे. त्यांना 23 जुलैपूर्वी मसूरी येथे प्रशिक्षण संस्थेत हजर राहण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यलयातून वाशिम जिल्ह्यात त्यांची बदली केल्यानंतर अनेक प्रकरणे समोर आली होती. त्यामुळे पूजा खेडकर आणि त्यांचे कुटुंब चांगलेच चर्चेत आले आहे. गेल्या वर्षी मुळशी येथील शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकाविल्याप्रकणी त्यांच्या आई-वडिलांसह इतरांवर पौड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना अटक देखील करण्यात आली आहे.

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याविरोधात छळाची तक्रार करत खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे खेडकर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या तक्रारीनंतर दिवसेंनी पहिल्यांदाच मीडियाला प्रतिक्रिया दिली.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी शुक्रवारी सकाळी मीडियाशी बोलताना सविस्तर बोलण्याचे टाळले. यावर बोलण्यासारखे काहीच नाही. तक्रारची प्रत मला मिळालेली नाही. त्यामुळे त्यावर काही बोलू शकत नाही, असे दिवसेंनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला पाठवलेल्या अहवालानंतरच पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT