MNS On Bangladesh Sarkarnama
महाराष्ट्र

MNS On Bangladesh Violence ...तर बांगलादेशींना शोधून ठोकणार; हिंदूंवरील अत्याचारावरून मनसे आक्रमक

Jagdish Patil

Bangladesh Violence : बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून उफाळलेल्या हिंसाचारामुळे तिथे सध्या अराजक माजलं आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. त्यामुळे बांगलादेशातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ सुरु आहे. हल्लेखोर तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना टार्गेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे तिथल्या हिंदूबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

अशातच आता मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी बांगलादेशमधील हिंदूंना जाणीवपूर्वक टार्गेट केलं, तर इथल्या बांगलादेशींना शोधून त्यांना मारून बांगलादेशला पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हिंदूंवरील अत्याचार प्रकरणी आता मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

तसंच इथल्या बांगलादेशींना (Bangladesh) शोधण्याची मोहीम मनसे राबवणार असून त्यानंतर जे काही परिणाम घडतील त्याला मनसे जबाबदार राहणार नसल्याचंही देशपांडे यांनी सांगितलं. तसंच भारतामध्ये सक्षम लोकशाही आहे आणि त्याला मानणारे लोक राहतात. सलमान खुर्शीद जसे बोलत आहेत, तसे होणार नाहीत आणि महाराष्ट्रात नवीन सलमान खुर्शीद हे संजय राऊत असून तसे त्यांचे विचार असल्याचंही टीका त्यांनी यावेळी केली.

बांगलादेशात हिंसाचार

बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारात आता जमावाने अवामी लीगच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. आतापर्यंत अवामी लीगचे 20 नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मृतदेह सापडले आहेत. तर अनेक ठिकाणी नेत्यांच्या घराची जाळपोळ सुरु आहे. त्यामुळे आता तेथील अवामी लीगचे नेते मोठ्या संकटात सापडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT