Imtiaz Jaleel Criticise Nitn Gadkari On Pune-Sambhajinagar Expressway News Sarkarnama
महाराष्ट्र

Imtiaz Jaleel News : 'रोडकरी' नितीन गडकरींना इम्तियाज जलील यांचे आव्हान; छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्यावरून एकदा प्रवास कराच!

Imtiaz Jaleel Criticise Nitin Gadkari : इम्तियाज जलील यांनी एक्सवर पोस्ट करत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांना टोला लगावला.

Jagdish Pansare

  1. पुणे-संभाजीनगर महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवास धोकादायक झाल्याची इम्तियाज जलील यांची टीका.

  2. जलील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना थेट आव्हान दिले की "या रस्त्यावरून प्रवास करून दाखवा".

  3. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून या मुद्द्यावरून राजकीय वाद पेटला आहे.

Marathwada Political News : देशात दळणवळणासाठी रस्ते आणि उड्डाणपुलांचे प्रचंड मोठे जाळे निर्माण केल्यामुळे 'रोडकरी' या नावाने ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सध्या सामाजिक आणि राजकीय लोकांच्याही निशाण्यावर आहेत. इथेनाॅल प्लांट आणि त्यातून कोट्यावधीचा नफा कमवत जनतेची दिशाभूल करण्याचा ठपका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरी यांच्यावर लगावला. तर आता छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्यावरील खड्यांवरून एमआयएमने त्यांच्यावर टीका केली आहे.

इम्तियाज जलील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनाही पुणे-छत्रपती संभाजीनगर या खड्डेच खड्डे असलेल्या रस्त्यावरून एकदा प्रवास करून दाखवाच, असे खुले आव्हान दिले आहे. त्यांनी या मार्गावरून प्रवास केला तर त्यांना दहा हजार एक रुपयांचे बक्षिस दिले जाईल, असे म्हणत राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांची खिल्ली उडवली आहे.

इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) काल पुण्यात होते. तिथे पत्रकार परिषदेत त्यांनी नगरमध्ये झालेल्या राड्यासह राज्यातील विविध प्रश्नावर आपली भूमिका मांडली. पुण्याहून छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना त्यांना नेहमीपेक्षा अधिकचे खड्डे या मार्गावर पडल्याचे जाणवले. तसा पुणे-संभाजीनगर प्रवास ते नेहमीच करतात, पण गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात प्रचंड पाऊस, अतिवृष्टी पुर परिस्थिती निर्माण झाली. याचा परिणाम रस्त्यावर खड्डे पडण्यातही झाला. नेमकं याच मुद्यावरून इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

इम्तियाज जलील यांनी एक्सवर पोस्ट करत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या नेत्यांना टोला लगावला. पुणे-छत्रपती संभाजीनगर-पुणे रस्त्याला देशातील सर्वात वाईट रस्ता म्हणून मान्यता मिळाली पाहिजे. रस्त्यावर खड्डे नाहीत तर खड्डेच खड्डे आहेत. या रस्त्यावरून एकदा प्रवास केल्यास नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना 10001 रुपयांचे बक्षीस देईन, असा टोला लगावला.

खासदार असताना इम्तियाज जलील कायम दिल्लीत नितीन गडकरी यांची भेट घ्यायचे. अनेकदा त्यांच्या कामाचे, त्यानी देशभरात उभारलेल्या रस्ते आणि उड्डाणपुलांचे तोंडभरून कौतुकही ते करायचे. भाजपमधील एकमेव गडकरी असे नेते आहेत, ज्यांच्याबद्दल वाईट बोलता येणार नाही, असेही इम्तियाज जलील म्हणायचे. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूज असा एकच अखंड उड्डाणपूल शहरात असावा, यासाठी इम्तियाज यांनी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु हा प्रस्ताव पुढे सरकलाच नाही.

इम्तियाज जलील हे 2024 मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. आता महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते राज्यभरात दौरे करत आहेत. नगरमधली वादानंतर त्यांनी काल असदुद्दीन ओवोसी यांच्यासोबत सभा घेण्याचाही प्रयत्न केला, पण त्याला पोलीसांनी परवानगी नाकारली. दरम्यान, पुण्याहून परत असताना त्यांना रस्त्यावरील खड्डे जाणवले आणि त्यांनी नितीन गडकरीसह राज्यातील नेत्यांनाही डिवचले.

FAQs

प्र.१: इम्तियाज जलील यांनी नितीन गडकरींवर कोणती टीका केली?
उ: त्यांनी पुणे-संभाजीनगर रस्त्यावर खड्ड्यांमुळे प्रवास करणे धोकादायक झाल्याची टीका केली.

प्र.२: इम्तियाज जलील यांनी गडकरींना कोणते आव्हान दिले?
उ: त्यांनी गडकरींना या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून प्रवास करून दाखवण्याचे आव्हान दिले.

प्र.३: पुणे-संभाजीनगर महामार्गाची स्थिती कशी आहे?
उ: या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून प्रवास करणे कठीण झाले आहे.

प्र.४: या मुद्द्यावर राजकीय प्रतिक्रिया काय आहेत?
उ: AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी गडकरींवर टीका केल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

प्र.५: या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही उपाययोजना झाल्या आहेत का?
उ: आतापर्यंत ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत, पण नागरिकांकडून आणि नेत्यांकडून सतत मागणी होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT