Nitin Gadkari : 'माझ्याविरोधात पेड न्यूज कोण देते आणि कशासाठी देते मला ठाऊक आहे' : अनेक आरोपांनंतर गडकरी बोलले

Maharashtra politics : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यावरून विरोधकांवर गडकरी यांनी नाव न घेता जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर काही दिवसांपासून गंभीर आरोप होत आहेत.

  2. भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया न येता गडकरींनीही मौन पाळलं होतं.

  3. अखेर एका भाषणातून गडकरींनी आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Nitin Gadkari News : गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. त्यावर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. गडकरी यांनीसुद्धा यावर बोलण्याचे टाळले होते. मात्र आज (ता.29) एका कार्यक्रमातील भाषणातून त्यांनी झालेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"मी भ** करत नाही. कोण, कोणासाठी काम करत आहे आणि कोण पेड न्यूज देत आहेत, हे सर्व मला ठावूक आहे. मी असल्या आरोपांना घाबरत नाही आणि विचलित होत नाही, तुम्हीसुद्धा होऊ नका असा सल्लाही गडकरी यांनी दिला. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील एका उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, शेतकरी इंधनदाता, ऊर्जादाता झाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शेतमालापासून इथॅनॉल तयार करण्याचे काम केले जात आहे. माझी इनोव्हा गाडी याच इथेनॉलवर धावते. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होत आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. प्रदूषणातही घट झाली आहे. परदेशातून पेट्रोल आणि डिझेल आयातीत घट झाली आहे. आयातीवर यापूर्वी 22 लाख कोटी रुपये आपल्या देशातून परदेशात जात होते. त्यामुळे काही हजारो लोकांचा धंदा मारला गेला.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : आरक्षणा संदर्भात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला...'

आता हेच धंद्यातील दलाल अस्वस्थ झाले असून त्यांनी माझ्या विरोधात पेड न्यूज सुरू केल्या आहेत. मात्र तुम्ही चिंता करू नका. माझ्यावर कितीही आरोप केले तरी मी विचलित होणाऱ्यांमधील नाही. तुम्हीसुद्धा काळजी करू नका. कोण कोणाच्या सांगण्यावरून आरोप करत आहे हे जनतेला ठावूक आहे. सर्वांना सत्य काय ते कळते. आपली रेषा मोठी करण्यासाठी काही लोक असे आरोप करतच असतात. त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कुठल्याही राजकीय नेत्यांच्या आयुष्यात हे प्रसंग येत असतात. माझे सर्वात मोठे भांडवल हे जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहे.

मी 45 वर्षांपसून राजकारणात आहे. राज्यात असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. केंद्रात अकरा वर्षांपासून रस्ते व वाहतूक मंत्री आहे. कोट्यवधीचे रस्ते बांधले. विकास कामे केली केली आहेत. देशभर रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे विणले आहे. मात्र कधी भ*** केलेली नाही. एक पैसाही कंत्राटदारांकडून घेतलेला नाही. म्हणूनच कंत्राटदार मला घाबरतात. ज्या झाडाला सर्वाधिक फळे लागलात त्याच झाडाला सर्वाधिक दगड मारली जातात असे सांगून गडकरी यांनी विरोधकांसह नाव घेऊन टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari News : माझ्याविरोधात 'पेड पॉलिटिकल कॅम्पेन' चालविले! नितीन गडकरी यांचा मोठा दावा, कुणावर साधला निशाणा?

FAQs :

प्र.१: नितीन गडकरींवर कोणते आरोप झाले होते?
उ: त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे राजकीय आरोप करण्यात आले होते.

प्र.२: भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया आली?
उ: अद्याप भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

प्र.३: गडकरींनी आधी काय भूमिका घेतली होती?
उ: त्यांनी मौन बाळगलं होतं आणि भाष्य करणं टाळलं होतं.

प्र.४: अखेर गडकरींनी काय केलं?
उ: एका कार्यक्रमातील भाषणातून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

प्र.५: हे भाषण का चर्चेत आलं?
उ: कारण गडकरींनी स्पष्ट शब्दांत आरोपांना उत्तर दिलं आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com