Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sarkarnama
महाराष्ट्र

Lok Sabha Election News : गेल्या लोकसभा निवडणुकीत 99 उमेदवारांनीच वाचवली होती अनामत रक्कम

सरकारनामा ब्युरो

Pune News : सध्या देशभरात लोकसभा निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यातील मतदान हे संपले असून आता दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे. सर्वच पक्षाकडून आत्ता जोरदार तयारी करण्यात येत आहे. पक्ष फुटीनंतर देखील राज्यात महायुतीविरुद्ध (Mahayuti) महाविकास आघाडी (Mva) अशी लढत होत आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रमुख पक्षांच्या बरोबर आत्ता अनेक संघटना तसेच विविध छोटे मोठे पक्षातील उमेदवार उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळत आहे. असे असताना गेल्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) आढावा घेतला असता राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदार संघात 867 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यातील केवळ 99 उमेदवारांनाच अनामत रक्कम वाचेल एवढी मते मिळाली असल्याचं समोर आले आहे. ( Lok Sabha Election News)

देशात लोकसभा निवडणुक सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. प्रमुख पक्षांच्या बरोबरच सध्या मोठ्या प्रमाणावर अनेक लोक तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी हे यंदाच्या या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, असे असल तरी लोकसभा निवडणुका असो किंवा विधानसभा निवडणुका प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे ठराविक रक्कम म्हणेजच ‘अनामत रक्कम’ (सिक्युरिटी डिपॉझिट) जमा करावी लागते. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 25 हजार रुपये तर एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 12 हजार 500 रुपये जमा करावे लागत आहे.

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व 48 लोकसभा जागांवर 1 हजार 332 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होता. त्यात 1211 पुरुष होते तर 79 महिला उमेदवार रिंगणात होत्या. यापैकी 192 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरली होती. तर 273 जणांनी माघार घेतली होती. त्यामुळे निवडणूक रिंगणात 867 उमेदवार होते. त्यातील 99 उमेदवारांना झालेल्या मतदानापैकी सुमारे 17 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान मिळाले. म्हणजेच या उमेदवारांनी आपली अनामत रक्कम परत मिळवली आहे. बाकीच्या सर्व उमेदवारांना आपली भरलेली अनामत रक्कम वाचवता आलेली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अनामत रक्कम (डिपॉजिट) जप्त कधी होतं ?

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी 1/6 म्हणजेच 16.67 टक्के मते मिळाली नाहीत, तर त्याची अनामत रक्कम जप्त केली जाते तर 16.67 टक्क्यांपेक्षा जास्त जर मते मिळाली तर त्या उमेदवाराचे डिपॉझिट त्याला परत केले जाते. एखाद्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास किंवा कोणत्याही कारणास्तव त्याची उमेदवारी रद्द झाल्यास, जमा केलेले डिपॉझिट परत दिले जाते. तसेच विजयी उमेदवारांनासुद्धा डिपॉझिट परत मिळते.

(Edited By : Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT