Rajya Sabha Election Sarkarnama
महाराष्ट्र

Rajya Sabha Election : भोसले, गोयल यांच्या जागेवर कोण? महाराष्ट्रासह 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक

Who will be nominated from Maharashtra in the Rajya Sabha elections? : केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 राज्यांमधील 12 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून या दोन जागांवर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता आहे.

Pradeep Pendhare

Rajya Sabha Election 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाने 9 राज्यांमधील राज्यसभेच्या 12 जागांसाठी पोट निवडणुका जाहीर केल्या असून, महाराष्ट्रातील दोन जागांचा त्यात समावेश आहेत. उदयनराजे भोसले आणि पीयूष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार आहे. या जागांसाठी ३ सप्टेंबरला मतदान होऊन मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पीयुष गोयल भाजपचे (BJP) दोन राज्यसभा सदस्य निवडून आले. आता राज्यात त्यांच्या जागी पोट निवडणूक होणार आहे. हे दोन्ही खासदार भाजपचे होते. त्यामुळे महायुतीमधून या दोन्ही जागा भाजपच लढवणार, असे स्पष्ट झाले आहे. परंतु महायुतीमधील शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एखादी जागा मागतात का हे पाहणे मोठे उत्सुकतेचे ठरणार आहे.

आता या निवडणुकीत उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि पीयूष गोयल यांच्या जागेवर कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून संधी मिळावी यासाठी काहींनी फिल्डिंग देखील लावली आहे. भाजप या जागांवर नेमकी कोणाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. परंतु भाजप नेते देवेंद्र फडणवीस यावर केंद्राकडे कोणच्या नावाचा अहवाल पाठवतात, हे देखील पाहावे लागणार आहे.

निवडणूक कार्यक्रम

केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थान, हरियाणा, बिहार, आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्रिपुरा, तेलंगणा आणि ओरिसा या 9 राज्यांतील 12 जागांवर निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 14 ऑगस्टला अधिसूचना जारी करण्यात येणार आहे, तर 21 ऑगस्ट हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 22 ऑगस्टला छाननी होणार आहे. आसाम, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि त्रिपुरामध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्टला असेल तर बिहार, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा आणि ओरिसामध्ये उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्टला निश्चित करण्यात आली आहे. या सर्व जागांवर 3 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निकाल जाहीर होईल.

बिनविरोधाचे संकेत

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीच्या दोन्ही जागांबाबत कमालीची उत्सुकता आहे. या दोन्ही जागा भाजप जवळपास नक्की जिंकणार, असे स्पष्ट आहे. भाजपकडे विधानसभेत 106 आणि 15 अपक्ष, असे 121 आमदार आहेत. यासह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुमारे 90 आमदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशीच जास्त शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT